पाचोळा

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


आडवाटेला दूर एक माळ

तरू त्यावर ती एकला विशाळ

आणि त्याच्या बिलगोनिया पदास

जीर्ण पाचोळा पडे तो उदास !

उषा येवो शिंपीत जीवनासी

निशा काळोखी दडवु द्या जगासी

सूर्य गगनांतुनि ओतु द्या निखारा

मूक सारे हे साहतो बिचारा !

तरूवरची हसतात त्यास पाने

हसे मुठभर ते गवतही मजेने,

वाटसरु, वा तुडवीत त्यास जात

परी पाचोळा दिसे नित्य शान्त !

आणि अंती दिन एक त्या वनात

येइ धावत चौफेर क्षुब्ध वात

दिसे पाचोळा, घेरुनी तयाते

नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठें !

आणि जागा हो मोकळी तळाशी

पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३४


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP