मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक ८ वा

एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


देहस्थोऽपि न देहस्थो विद्वान् स्वप्नाद्यथोत्थितः ।

अदेहस्थोऽपि देहस्थः कुमतिः स्वप्नदृग्यथा ॥८॥

बद्धमुक्तांचें मिश्र लक्षण । तीं श्लोकीं सांगेल जाण ।

केवळ मुक्ताचें सुलक्षण । गोड निरूपण सात श्लोकीं ॥१६॥

देहीं असोनि देहबुद्धि नाहीं । हें मुक्ताचें मुक्तलक्षण पाहीं ।

यालागीं देंही असोनि विदेही । म्हणिये पाहीं या हेतू ॥१७॥

स्वप्नींचे राज्य आणि भीक । जागृतीं मिथ्या दोन्ही देख ।

तैसें देहादि जें सुखदुःख । तें मिथ्या देख मुक्तासी ॥१८॥

जो स्वप्नी मरोनि जाळिला । तो जागृतीं नाहीं राख जाहला ।

तैसा प्रपंच मिथ्या जाणितला । मुक्त बोलिला त्या नांव ॥१९॥

स्वप्नींचें साधकबाधक । जागृतीं आठवे सकळिक ।

त्याचें बाधीना सुखदुःख । तैसें संसारिक मुक्तासी ॥२२०॥

आतां ऐक बद्धाची हे स्थिती । तो वस्तुतां असे देहातीतीं ।

परी मी देह हें मानी कुमती । दुःखप्राप्ती तेणें त्यासी ॥२१॥

जळीं देखे प्रतिबिंबातें । मी बुडालों म्हणोनि कुंथे ।

कोणी काढा काढा मातें । पुण्य तुमतें लागेल ॥२२॥

स्वप्नीं घाय लागले खड्गाचे । तेणें जागृतीं म्हणे मी न वांचें ।

ऐसें निबिड भरितें भ्रमाचें । तें बद्धतेचें लक्षण ॥२३॥

स्वप्नींचें सुखदुःख नसतें । तें स्वप्नभ्रमें भोगितां कुंथे ।

तेवीं देह मी म्हणोनि येथें । नाना दुःखांते भोगितू ॥२४॥

स्वस्वरूपाचें विस्मरण । तेणें विषयासक्ति दृढ जाण ।

संकल्प विकल्प अतिगहन । तेंचि लक्षण बद्धाचें ॥२५॥

आणिकें लक्षणें त्याचीं आतां । सांगतु असें तत्त्वतां ।

भोग भोगोनि अभोक्ता । ते मुक्तावस्था परियेसीं ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP