मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणतीसावा|
श्लोक ३० वा

एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


नैतत्त्वया दाम्भिकाय, नास्तिकाय शठाय च ।

अशुश्रूषोरभक्ताय, दुर्विनीताय दीयताम् ॥३०॥

शठ नास्तिक दंभयुक्त । अशुश्रूषु आणि अभक्त ।

ज्यांची स्थिति दुर्विनीत । ते शिष्य निश्चित त्यागावे ॥१॥

जेणें लोकरुढी होय गहन । तें तें बाह्य कर्माचरण ।

विपुल धन आणि सन्मान । तदर्थीं जाण अतितृष्णा ॥२॥

ऐसें ज्याचें दांभिक भजन । त्यासी हें एकादशींचें ज्ञान ।

वोसणतां गा आपण । स्वप्नींही जाण नेदावें ॥३॥;

मोहममतेचें आधिक्य । तेणें निर्दळिलें निज आस्तिक्य ।

वेदीं शास्त्रीं दृढ नास्तिक्य । देवचि मुख्य नाहीं म्हणती ॥४॥

नास्तिक्यवादाचिया बंडा । या ज्ञानाचा ढोरकोंडा ।

लागों नेदी त्यांचिया तोंडा । ज्यांचा भाव कोरडा नास्तिक्यें केला ॥५॥

नास्तिक्यवादापुढें । ज्ञान कायसें बापुडें ।

अनीश्वरवादाचें बंड गाढें । ते त्यागावे रोकडे नास्तिक्यवादी ॥६॥;

अनन्यभावें न रिघे शरण । मिथ्या लावूनि गोडपण ।

धूर्तवादें घेवों पाहे ज्ञान । तेही शठ जाण त्यागावे ॥७॥

शठाची ऐशी निजमती । पुढिलांची ठकूनि घे युक्ती ।

परी जे आपुली व्युत्पत्ती । ते पुढिलांप्रती सांगेना ॥८॥

काया वाचा मन धन । जो गुरुसीं करी वंचन ।

जो गुरुचे देखे दोषगुण । तोही शठ पूर्ण त्यागावा ॥९॥

माझें अतिथोर महिमान । गुरुसेवा केवीं करुं आपण ।

सेवा न करी महिमेभेण । तोही शिष्य जाण त्यागावा ॥५१०॥

आपण श्रेष्ठासनीं बैसोनि बरवा । सेवकाहातीं करवी गुरुसेवा ।

तो दांभिक शिष्य जाणावा । तोही त्यागावा ये ग्रंथीं ॥११॥

सद्गुरुपाशीं समर्थपण । जो आपली मिरवी जाणीव जाण ।

जो सेवा न करी गर्वें पूर्ण । तो शिष्य जाण त्यागावा ॥१२॥

मी धनदानी अतिसमर्थ । नीचसेवेसी न लावीं हात ।

ऐसाही जो गर्वयुक्त । तोही निश्चित त्यागावा ॥१३॥

जो लौकिक लाजेभेण । गुरुसेवा न करी आपण ।

ज्यासी लौकिकाचा अतिअभिमान । तोही शिष्य जाण त्यागावा ॥१४॥

जो गुरुगृहींचें नीच कृत्य । न करी मानूनि मी समर्थ ।

तो मान्यताअभिमानयुक्त । जाण निश्चित त्यागावा ॥१५॥

न करी गुरुसेवा नीचवृत्ती । आम्हां अखंड ध्यान हेचि गुरुभक्ती ।

ऐशी सेवावंचक ज्याची युक्ती । तोही निश्चितीं त्यागावा ॥१६॥

नीच सेवा न करी आपण । म्हणे मागाल तें देईन धन ।

ऐसा धनवर्गी शिष्य आपण । सर्वथा जाण न करावा ॥१७॥

धरुनि धनाची आस । गुरु शिष्यासी देत उपदेश ।

तैं ब्रह्मज्ञान पडलें वोस । वाढला असोस धनलोभ ॥१८॥

अथवा वेंचूनिया धन । जो घेईन म्हणे ब्रह्मज्ञान ।

ऐसा धनाभिमानी शिष्य जाण । सर्वथा आपण न करावा ॥१९॥

यथाकाळें जाहली प्राप्त । गुरुसेवा जे कालोचित ।

न करी तो ’अशुश्रूषु’ म्हणत । तोही निश्चित त्यागावा ॥५२०॥;

करितां सद्गुरुची भक्ती । मी उद्धरेन निश्चितीं’ ।

ऐसा भाव नसे ज्याचे चित्तीं । तो शिष्य हातीं न धरावा ॥२१॥

सद्गुरु तोचि ब्रह्ममूर्ती । ऐसा भाव नाहीं ज्याच्या चित्तीं ।

मूळींच विकल्पाची वस्ती । तोही शिष्य हातीं न धरावा ॥२२॥

गुरुहोनि ब्रह्म भिन्न । ऐसें ज्याचें निश्चित ज्ञान ।

तो निश्चयेंसीं ’अभक्त’ जाण । त्यासी शिष्य आपण न करवें ॥२३॥

मनुष्य मानूनि सद्गुरुसी । जो उल्लंघी गुरुवचनासी ।

तो जाण पडला अपभ्रंशीं । त्या शिष्यासी त्यागावें ॥२४॥

सद्गुरुहोनि अधिकता । शिष्य आपुली मानी पवित्रता ।

तो अभक्तांमाजीं पूर्ण सरता । त्यासी तत्त्वतां त्यागावें ॥२५॥

गुरुच्या ठायीं ब्रह्मस्थिती । ज्यासी श्रद्धा संपूर्ण नाहीं चित्तीं ।

याचि नांव गा ’अभक्ती’ । जाण निश्चितीं उद्धवा ॥२६॥

कां ये ग्रंथींचें ब्रह्मज्ञान । ज्यासी निश्चयें नमने जाण ।

त्यासी केव्हांही आपण । झणें विसरोन शिष्य करिसी ॥२७॥

ये ग्रंथींची ब्रह्मस्थिती । वक्ता जो मी परब्रह्ममूर्ती ।

त्या माझ्या ठायीं नाहीं ज्याची भक्ती । तो शिष्य निश्चितीं त्यागावा ॥२८॥

ये ग्रंथींचें आवडे ज्ञान । गुरुच्या ठायीं श्रद्धा संपूर्ण ।

परी ज्याचें उद्धत वर्तन । तो शिष्य जाण त्यागावा ॥२९॥

माझ्या निजमूर्ति संत सज्जन । माझे भक्त माझे जीवप्राण ।

त्यांचें जो करी हेळण । ’दुर्विनीतपण’ या नांव ॥५३०॥

माझ्या भक्तांमाजील रंक जाण । त्याचे सर्वस्वें वंदावे चरण ।

हें ज्यासी नावडे संपूर्ण । ’दुर्विनीतपण’ या नांव ॥३१॥

साधुसज्जनां भेटों जाये । शठनम्रता वंदी पाये ।

त्याचे गिवसोनि दोषगुण पाहे । ’दुर्विनीतता’ राहे ते ठायीं ॥३२॥

दुष्टबुद्धीची जे विनीतता । ती नांव बोलिजे ’दुर्विनीतता’ ।

ऐशी ज्या शिष्याची अवस्था । तो जाण तत्त्वतां त्यागावा ॥३३॥

ऐसें हें ऐकोनि निरुपण । म्हणसी ’मी शिष्य न करीं जाण’ ।

तरी जो सच्छिष्यासी उपदेशी ब्रह्मज्ञान । तो आत्मा जाण पैं माझा ॥३४॥

जो उपदेशीं सत्पात्र पूर्ण । त्या सच्छिष्याचें लक्षण ।

तुज मी सांगेन निरुपण । ऐक सावधान उद्धवा ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP