मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा| आनंद ! कोठें आहे येथें ? परिचय महासर्प दिवाकर -एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? अवघें पाउणशें वयमान मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी ! कार्ट्या ! किती रमणीय देखावा हा ! अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मुंबईत मजा गमतीची । म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ? दिवाकर - आनंद ! कोठें आहे येथें ? नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. Tags : diwakarnatyachataदिवाकरनाट्यछटा आनंद ! कोठें आहे येथें ? Translation - भाषांतर ''.... देवानें शेवटी माझी अशी निराशा केली ! हाय ! स्वर्गलोकाला सोडून मी येथें कशाला बरें आलों ? जिकडे तिकडे अगदीं अंधार - अंधार आहे येथें ! भूलोक समजून मी चुकून नरकांत तर नाहीं ना आलों ? अरे मला घोडाघोडा खेळायला कोणी एक तरी सूर्यकिरण द्या रे ! तीन दिवस झाले, पण मला प्यायला, एकसुद्धां स्वच्छ व गोड असा वायूचा थेंब अजून मिळाला नाहीं ! देवा ! तूंच नाहीं का मला सांगितलेंस कीं, या मृत्युलोकांत आनंद आहे म्हणून ? मग कोठें आहे रे तो आनंद ? हाय ? नऊ महिने सारखा अंधारांत धडपडत, ठेंचा खात, वारंवार नरड्याला वेलीनीं घट्ट बसविलेले कांटेरी फांस सोडवीत खोल अशा घाणेरडया चिखलाच्या डबक्यांतून रडत रडत, मोठ्या आशेनें मीं प्रवास केला, पण शेवटी काय ? - नको ! अरे काळोखा ! असे कडकडा दांत खाऊन जिकडे तिकडे अशी तेलकट घाण पसरुं नकोस ! - माझ्या जिवाला आग लागली ! मला तडफडून मारुं नका रे ! - आ ! माझ्या तोंडावरचा हा धुराचा बोळा काढा ! नाहीं ! मी पुनः येथें येणार नाहीं ! अरेरे ! माझ्या आशेचा उंच डोलारा शेवटीं या काळोखांत विरुन गेला ना ! काय ? येथें मोठमोठ्यानें रडायला सुरवात झाली ? चला ! आधीं आपल्या स्वर्गाला परत चला ! .... '' २ नोव्हेंबर १९११ N/A References : N/A Last Updated : September 13, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP