मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा| फाटलेला पतंग परिचय महासर्प दिवाकर -एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? अवघें पाउणशें वयमान मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी ! कार्ट्या ! किती रमणीय देखावा हा ! अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मुंबईत मजा गमतीची । म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ? दिवाकर - फाटलेला पतंग नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. Tags : diwakarnatyachataदिवाकरनाट्यछटा फाटलेला पतंग Translation - भाषांतर '' .... छे ! आतां कोठून मी धड व्हायला ! अशा फाटलेल्या स्थितीतच फडफड - रडरड - करीत मला किती काल कंठावा लागणार आहे, तें एका ईश्वरालाच ठाऊक ! - अहो ! नका ! त्या आकाशाकडे पाहूं नका ! हरहर ! हेंच निरभ्र आकाश निराशेची घरघर लागलेल्या प्राण्यालासुद्धा, गोड - सुंदर - अशीं मोठमोठीं स्वप्नें पाडून - बिचार्याला नादीं लावून - कधीं म्हणून लवकर मरुं देत नाहीं बरें ! अशा स्वच्छ आकाशांत, अमळ वारा आनंदानें खेळूं लागला कीं, अंतः करणांत गुंडाळून ठेवलेली - सदैव आनंदाश्रु व दुःखाश्रु यांनीं भिजलेली माणसाची कल्पनाशक्ति - जगाच्या दुर्लक्षपणानें हूं म्हणतांच - जिवाला इतक्या कांहीं उंचच उंच भरार्या मारीत घेऊन जाते कीं, शेवटीं पश्चिमेच्या अंकावर अर्धवट झोंपीं गेलेला सूर्य एकदम जागा होऊन विचारतो कीं, ' नभोमंडलांत माझ्यामागे इतक्या वैभवानें हा कोण बरें महात्मा तळपतो आहे ? ' - पण अरेरे ! तो वैभवाचा क्षण आत्म्याला मिळतो - न मिळतो - तोंच ' ओढा खाली ! खालीं खेंचा ! नाहीं तर तो वेडा होऊन, कोठें तरी भडकेल ! ' अशी एकच जगाची हाकाटी सुरु होते ! मग काय ? खालीं जग, वर स्वर्ग, या उभयत्नांच्या जोरानें - अगदी निकरानें - चाललेल्या ओढाताणीमध्यें बिचार्या जिवाची - हाय ! - किती भयंकर दशा होते म्हणून सांगूं तुम्हांला ! - नको ! त्या दिवसाची - त्या स्थितीची आठवणसुद्धां नको ! अहो ! एके काळी धड असलेला हा फाटका पतंग, अशाच जगाच्या व स्वर्गाच्या ओंढाताणीमध्यें सांपडला होता बरें ! अहाहा ! किती सुखाचा - माझ्या पूर्ण भाग्याचा - दिवस होता तो ! ब्रह्मानंदाकडे न्यायला आलेला शीतल वायु कसा अगदी मिठी मारुन की हो मला घेऊन चालला होता ! जगाला मी पूर्ण विसरुन - पण होय ? जग कोठें मला विसरलें होतें ? माझी किंमत किती ? पण तिचासुद्धां जगाला कांही केल्या लोभ सुटत नाहीं ! शेवटीं ! जग मला खेंचूं लागलें - ' स्वर्ग जातो ! स्वर्ग जातो ! ' असें म्हणून मी मोठमोठ्यानें रडूं लागलों - अगदी सुचेनासें होऊन संतापाच्या - सोसाट्याच्या - वावटळींत सांपडून धाडकन् - या बाभळीच्या झाडावर येऊन आदळलो ! आतां हें फाटलेलें हदय कधीं तरी धड होईल का हो ! - नाहीं ! - नाहीं ! - नाही !! - उलट मी आतां दिवसानुदिवस अधिकाधिक असा विरतच जाणार ! - अहो ! माझ्या स्थितीबद्दल रडूं नका ! आधी ऐका ! एकदां धड असलेल्या पतंगाचें - या बाभळीच्या कांट्यांवर बसून अहोरात्र रडणारें - कण्हणारें - फाटत चाललेलें पिशाच्च ! - काय सांगतें तें ऐका ! गर्वानें भरार्या मारुं नकोस ! भरार्या मारुं नकोस ! नाहीं तर अस्सा फाटून - जन्मभर, जन्मभर - रडत बसशील !.... '' २६ जानेवारी १९१२ N/A References : N/A Last Updated : September 17, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP