मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा| मग तो दिवा कोणता ? परिचय महासर्प दिवाकर -एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? अवघें पाउणशें वयमान मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी ! कार्ट्या ! किती रमणीय देखावा हा ! अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मुंबईत मजा गमतीची । म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ? दिवाकर - मग तो दिवा कोणता ? नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. Tags : diwakarnatyachataदिवाकरनाट्यछटा मग तो दिवा कोणता ? Translation - भाषांतर '' .... सखे ! दुसरा दिवा आणतेस ना ? - अरेरे ! या माझ्या दिव्यांत कितीतरी किड्यांचा बुजबुजाट झाला आहे ! माझ्या तेलाची घाण झाली ! - घाण झाली !! - काय ? काजळाचा बर्फ पडत आहे ! - सखे ! अग सखे ! येतेस ना लवकर ? - अग, माझ्या खोलींत जिकडेतिकडे हा दिवा काजळ उधळीत आहे ! अरे दिव्या ! माझ्यावर जितका काजळाचा वर्षाव करावयाचा असेल तितका कर ! - पण माझ्या या शेक्सपीअरवर व ब्राउनिंगवर एक कणसुद्धां टाकूं नकोस ! - हाय ! हें तेल किती स्वच्छ होतें ! पण आतां ! - हे किडे उसळून उडया मारायला लागले म्हणजे हेंच तेल, निळें, पिंवळें, हिरवें, तांबडे लाल ! - पहा, पहा ! कसें आतां काळें झालें आहे तें ! - दिवा भडकला ! - काय म्हटलेंस ? दुसरा दिवा नाहीं ? तुला कोणीं धरुन ठेवलें आहे ! - हाय ! माझ्या तुळईला आग लागली ! - माझें घर पेटलें ! - धांवा ! धांवा !! मी भाजून मेलों ! मला कोणी तरी वांचवा हो ! काय हा आगीचा डोंब ! देवा ! देवा !! - हं ! येथें तर कांहीं नाहीं ! शांततेच्या मांडीवर काळोख तर स्वस्थ घोरत आहे ! आग नाहीं, कांही नाहीं ! मग, तो दिवा कोणता बरें भडकला होता ? .... '' ९ नोव्हेंबर १९११ N/A References : N/A Last Updated : September 13, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP