मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा| अवघें पाउणशें वयमान परिचय महासर्प दिवाकर -एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? अवघें पाउणशें वयमान मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी ! कार्ट्या ! किती रमणीय देखावा हा ! अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मुंबईत मजा गमतीची । म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ? दिवाकर - अवघें पाउणशें वयमान नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. Tags : diwakarnatyachataदिवाकरनाट्यछटा म्हातारा इतुका न । अवघें पाउणशें वयमान ॥ Translation - भाषांतर ''.... अहो छे हो ! तिला आणखी तिच्या मुलाला मरुन अजून पुरते दोन महिनेसुद्धां झाले नाहींत ! प्लेगचेच दिवस होते ते ! कांही फार दिवसांची गोष्ट नाहीं मी सांगत तुम्हांला - हं ! तिला विचारीला स्मशनांत एकटीला चैन पडलें नसेल, म्हणून माझ्या दामूलाही घेऊन गेली असेल झालें ! असो, जशी ईश्वराची इच्छा ! - यमू म्हणजे माझी प्रत्यक्ष सख्खी चुलत बहीण ! ती प्लेगानें आजारी पडून, तिला वायु झाला आहे, हीं अक्षरें दामूच्या पत्रांत दिसायचा अवकाश, तों मला जें कांहीं रडूं कोसळलें, तें कांहीं पुसूंच नका ! किती वेळां तरी मनांत आलें कीं, तिच्याकडे जावें म्हणून ! पण अगदी नाइलाज होता ! - एक तर ते प्लेगचेच दिवस; व दुसरें असें कीं, घरामध्यें इकडे माझ्या नातवाचा दिवाळसण ! आणि त्यांतून, पुण्यापासून मुंबईपर्यतच्या प्रवासाची दगदग ! या वृद्धावस्थेंत, दम्यानें अगदीं गांजलेल्या या जिवाला, कशी बरें सहन झाली असती ! नाहीं, तुम्हीच सांगा ! - अनंतराव, काय सांगूं तुम्हांला ! ते दोन दिवस माझा जीव कसा अगदीं काळजीच्या भोंवर्यांत सांपडला होता ! - अहो पुढें काय ? प्रारब्ध माझें ! दामूच्या पत्रानंतर अगदीं चौथ्या दिवशी सकाळींच, त्याच्या एक स्नेह्याचें पत्र आलें कीं, माझी यमू व तिचा तो दामू, दोघेंही बिचारी प्लेगाच्या वणव्यांत सांपडून तडफडून मेली म्हणून ! दुःखाचा अगदीं पर्वत कोसळला होता माझ्यावर ! - पण तसाच धडपडत कसा तरी एकदांचा चार - पांच तास मुंबईस जाऊन, दामूच्या मित्रानें - मोठा सच्चा माणूस ! जें कांहीं त्यांचें किडूकमिडूक ठेवलें होतें, तें सगळें कांहीं मी येथें घेऊन आलों ! - आतां त्यांच्या घरादारांची व शेतांची कांहीं तरी व्यवस्था मला नको का करायला ? माझ्या यमूला आतां मीच काय तो एकटा वारस - हर हर ! या प्लेगाच्या वादळानें त्यांचा वंशवृक्षच किं हो कोसळून पडला ! कठीण ! - काळ मोठा कठीण येत चालला आहे ! असो ! पण का हो अनंतराव, माझ्या यमूची घरेंदारें व शेतें आतां माझ्या कबजांत यायला मार्गात कांहीं अडचणी तर नाही ना येणार ? .... '' ४ नोव्हेंबर १९११ N/A References : N/A Last Updated : September 13, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP