मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा| काय ! पेपर्स चोरीस गेले ? परिचय महासर्प दिवाकर -एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? अवघें पाउणशें वयमान मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी ! कार्ट्या ! किती रमणीय देखावा हा ! अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मुंबईत मजा गमतीची । म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ? दिवाकर - काय ! पेपर्स चोरीस गेले ? नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. Tags : diwakarnatyachataदिवाकरनाट्यछटा काय ! पेपर्स चोरीस गेले ? Translation - भाषांतर '' .... तर काय हो ! जिवावर केवढी थोरली धोंड आहे माझ्या ! एक नाहीं दोन नाहीं, आठ तुकडयांचे दणदणीत पेपर्स ! शिवाय प्रत्येक तुकडींत चाळीस पंचेचाळीस काटी ! रोज एक गठ्ठा म्हटला, तरी दिवस पाहिजेत आठ ! अन् राहिलेत सारे चार ! - तितकेहि नाहींत ? अरे म्हणजे म्हणतां आहां काय तुम्ही ! बेडबडि तर नाहीं लागलें ! - एकवीस तारीख आज ? - छेः ! भलतेंच कांहीं तरी ! आणा पाहूं ती डायरी इकडे ! - उगीच आपलें कांहीं तरी .... अरे भाई, खरेंच कीं, हें तर वीस तारखेचें पान ! धडधडीत मीं लिहिलें आहे - हो, हो, अगदी शंकाच नको ! बापरे ! आज एकवीस तारीख, आणि उद्याला तर हें खलास व्हायला हवें ! राम राम ! प्राण खातील माझा आतां ! काय, करुं तरी काय आतां ! - हो, रात्रीचे आतां आठ वाजलेले, अन् सकाळींच उद्यां आठाला सगळे हजर करायचे ! तेव्हां काय जीव देऊं इथं ? - बरं, आता रातोरात बसून तपाशीन म्हटलें तर पोरटयांनी थोडं का हो लिहिलं आहे ! - आग लागो त्या पेपरांना ! नाहींसे कुठें होतील तर देव पावेल ! हो, आतां मी तरी .... अरे कोण तिकडे, काय बडबडतां आहां रे ? गोंगाट कसला येवढा ? - काय .... काय .... म्हणतोस विष्ण्या ? अरे ! काय सांगतो आहेस तरी काय ! पेपर्स चोरीस गेले ? चल ! कांही तरी बरळतो आहेस झालें ! गाढवा ! पेपर्स का कधीं चोरीस गेले आहेत ? - थांब, मीच उठून .... माय गॉड ! खरेंच कीं ! पार सगळेच्या सगळे गठ्ठे .... वा, वा ! फारच छान झालं ! पेपर्स चोरीस गेले ! बस, बस ! केवढा आनंद .... काय आनंद झाल आहे म्हणून सांगूं ! जा जा, पळ लवकर ! आधीं चहा ठेवायला सांग ! - आणि हें बघ विण्या ! साखर थोडी जादा ढकलायला सांग ! बस ! आज मैं तो बादशहा हूं ! - अरे ! काय, मांडलें आहेत काय तुम्ही ! इतक्या लवकर चहा आणलास ? - आधींच ठेवला होता होय ? शाबास ! हुशार आहांत रे सगळे तुम्ही ! पण काय रे ! हें सगळें स्वप्न तर नाहीं ना ? नाहीं तर .... हो बाकी लागतो आहे खराच .... हाताला चांगलाच पेला कढत लागतो आहे ! आणि वास काय झकास सुटला आहे ! रंगसुद्धां खुलून आला आहे कीं ! - थांब, बेटा विष्णु ! मला एकदां चांगला मनापासून .... अस्सा अगदीं हातपाय ताणून आ .... आळस - अरे ! का .... काय रे हें ! अरे काय माझ्या टाळक्यांत पडलें हें ! - हर हर ! हे तर पेपर्स ! आणि मघांशी चोरीस गेले ते ? - स्वप्नांतच का ? .... '' ३ फेब्रुवारी १९२८ N/A References : N/A Last Updated : September 18, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP