मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा| फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! परिचय महासर्प दिवाकर -एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? अवघें पाउणशें वयमान मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी ! कार्ट्या ! किती रमणीय देखावा हा ! अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मुंबईत मजा गमतीची । म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ? दिवाकर - फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. Tags : diwakarnatyachataदिवाकरनाट्यछटा फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! Translation - भाषांतर '' .... ये ! जोजफीन ! जिवाचा भडका ! - भडका झाला आहेग ! प्रिये ! नको थांबूस ! एक पाऊल पुढें ये - कडकडून मिठी मार ! - कीं या तापलेल्या देहाचें थंड - गोड - अमृत होईल ! - अग ये ! लवकर ये ! - स्वर्गात तर भेटूंच - कायमचेच भेटूं ग ! पण आधीं - हाय ! जोजफीन ! फ्रान्स ! फ्रान्स !! दाबा ! डोक्यावर हातोड्याचे घाव घाला ! पण ध्यानांत ठेवा ! सूर्याचा गळा दाबीत आहां ! रक्तानें न्हालेल्या - संतापानें लाल झालेल्या सूर्याचें मस्तक फोडून - पहा ! एका सूर्याला फोडलें - पण वेडयांनो ! आकाशांत - जगांत - पहा कसे हे लक्षावधी सूर्य जळत आहेत ते ! - डॉक्टर ! माझ्या बाळाला संभाळा ! - हाय ! सेंट हेलेनांत - या जळजळीत निखार्यांत मला निजवूं नका ! उचला ! ती पहा ! माझी लाडकी फ्रान्स माझ्याकरितां ओरडत आहे ! निजवारे ! तिच्या मांडीवर मला - आटपा ! बसूं नका ! महत्त्वाकांक्षेची दारु ठासा ! - मनुष्याच्या हदयांत जोरानें दारु ठाशीत चला, कीं आज नाही उद्यां - लक्षावधी - कोट्यावधी वर्षानी ! - पण केव्हां तरी शेवटीं आपला - मनुष्याचा जय हा होणारच ! त्रिभुवनाला - प्रत्यक्ष ईश्वरालासुद्धां आपण जिंकणार ! त्याला आपलें कौतुक करायला लावणार ! एवढ्याचकरितं तर - अहा ! किती सोसाट्याचें व मजेदार वादळ हें ! यः कश्चित् धुळीचे कण ! पण पहा कसें यांच्यांत महत्त्वाकांक्षेचें वारें संचारलें आहे ! - आल्पस ? सगळें जग थरारुन कोसळून पडलें पाहिजे ! चला ! पुढें व्हा ! अरे जिवाची कल्पना एका क्षणांत जर जगाला काडकन् फोडून टाकते ! तर प्रत्यक्ष जिवानें खरोखर त्रिभुवन फोडून त्याचा चुराडा केलाच पाहिजे ! नाहीं तर जन्माला यायचं कशाला ? - हं ! अशा तोफांच्या गोळ्यांचा पर्वत जरी या नेपोलिअनवर - पकडा ! चालूं द्या ! या चवताळलेल्या जगावर निकरानें हल्ला करा ! स्टिंगेल ! डिसेबस ! मेसिना ! शाबास ! अस्सें ! जोरानें ठोसे मारा ! पेटूं द्या ! सगळें आंग पेटलें तरी - ओरडा ! जयजयकार ! फ्रान्सचा जयजयकार ! फ्रान्स ! फ्रान्स ! - सैन्य ! - माझें सैन्य ! - जोजफीन ! .... '' ४ एप्रिल १९१३ N/A References : N/A Last Updated : September 17, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP