मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा| '' शिवि कोणा देऊं नये ! '' परिचय महासर्प दिवाकर -एका हलवायाचें दुकान एः ! फारच बोबा ! आनंद ! कोठें आहे येथें ? अवघें पाउणशें वयमान मग तो दिवा कोणता ? दिव्याभोंवती पतंग उडत आहेत अहो, आज गिर्हाईकच आलें नाही ! अहो कुंभारदादा ! तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी ! कार्ट्या ! किती रमणीय देखावा हा ! अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? देवा ! मुंबईत मजा गमतीची । म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! जातिभेद नाही कोठें ? कोकिलाबाई गोडबोले वर्डसवर्थचें फुलपांखरुं फाटलेला पतंग चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच ओझ्याखाली बैल मेला ! कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. शेवटची किंकाळी ! पाण्यांतील बुडबुडे रिकामी आगपेटी पंत मेले - राव चढले झूट आहे सब् ! पोरटें मुळावर आलें ! '' शिवि कोणा देऊं नये ! '' एका नटाची आत्महत्या कशाला उगीच दुखवा ! फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! असें केल्याशिवाय जगांत भागत नाही ! एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! पण बॅट् नाहीं ! नासलेलें संत्रें स्वर्गांतील आत्मे ! कारण चरित्र लिहायचें आहे ! माझी डायरेक्ट मेथड ही ! हें काय उगीचच ? तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! काय ! पेपर्स चोरीस गेले ? हें काय सांगायला हवें ! सायकॉलॉजिकली ! त्यांत रे काय ऐकायचंय ! बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! यांतही नाहीं निदान - ? दिवाकर - '' शिवि कोणा देऊं नये ! '' नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. Tags : diwakarnatyachataदिवाकरनाट्यछटा '' शिवि कोणा देऊं नये ! '' Translation - भाषांतर ''..... लेका नीट म्हण ! अशी रडल्यासारखी काय कविता म्हणतोस ? तुझ्या वरच्या मुलानें नाहीं, कशी छान गळ्यावर म्हटली ती ! - चल आटप् , म्हण पुनः नीट गळ्यावर ! म्हण, - ' शिवी को - णादे - ऊन - ये, ' - पाहा ! आहे ? लागला पुनः कुत्र्यासारखा रडायला ! चल इकडे ये, म्हसोबा ! तुला चांगला सडकला पाहिजे ! गुलामा ! चल आटप् ! - अस्सं ! लक्ष द्यायला नको, नुसता रेडयासारखा माजला आहेस ! जा, बाकावर उभा रहा ! उद्यां जर कविता नीट म्हटली नाहींस तर दाखवितों कशी सूर्याची पिल्लें आहेत तीं ! - काय आहे ? काय गडबड आहे ? काय झालें रे ? - तुला शिवि दिली ? कुणी ? - त्या आगाशानें का ? चल उभा रहा रे आगाशा ! गोखले, तुला काय शिवी दिली रे या म्हारड्यानें ? अरे टोण्या ! तूं याला गाढव म्हणालास का ? चल इकडे ये ! - इरसाल ! - चांगला अस्सा हात पुढें केलास तर मरशील का ? अं ! कोंबडीच्या, तूं याला काय म्हणून गाढव म्हणालास रे ? धेडा ! तूं कोण त्याचा बाप, का आजा, का मास्तर ? - चूप रहा, रडूं नको ! गाढवाच्या लेका, पुनः देशील का कधीं कोणाला अशा शिव्या ? डांबीस कुठला ! - शाळेंत येऊन हेंच शिकलां वाटतें ? - शिवी कोणा देऊं नये, ही कविता, काल जी येवढी घसाफोड करुन मी समजावून दिली, ती कशाकरतां रे ? तुम्ही अशा शिव्या द्याव्या म्हणून होय ? - जा ! जागेवर बैस ! गाढवा, पुनः अशा शिव्या तर दे कोणाला, कीं पायांपासून डोक्यापर्यत चांगला फोडून काढतों ! - हं, चल रे भागवत, उभा रहा कविता म्हणायला ! इब्लिस कारटीं ! शिंची गुडघ्यायेवढीं झालीं नाहींत, तों लागली आपलीं मोठ्या माणसासारखीं शिव्या द्यायला ! - '' १८ जून १९१२ N/A References : N/A Last Updated : September 17, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP