|
स्त्री. शक्ति ; दुर्गा ; लक्ष्मी , सरस्वती ; आदिमाया इ० देवता . - वि . ईश्वरासंबंधींचा . ( काव्य ) अतिशय भव्य , उदात्त , विपुल , अद्वितीय वगैरे अर्थीहि वापरतात . जसें :- ईश्वरी आनंद ; ईश्वरी नाश ; ईश्वरी बल , लाभ , सोहळा . अशा तर्हेचा याचा उपयोग शुध्द आणि अभिजात असून ईश्वर अर्थ ४ प्रमाणें तो सदोष नाहीं . [ सं . ] ०आनंद पु. परमेश्वरस्वरुपांत मानिलेला आनंद , सुख ; ईश्वराच्या ठिकाणीं वाटणारा आनंद . परमेश्वरापासून मिळणारें सुख . अत्यंत सुख ; दैवी सुख ; ब्रह्मानंद . ०उत्पात पु. दैवी आपत्ति चमत्कार ; भयंकर स्वरुपाचा सृष्टचमत्कार ( वीज , धूमकेतु इ० ) ०ऋणानुबंध पु. परमेश्वरी , दैवी घटना ; ईश्वरी नेमानेम ; विधिघटना . ०करणी कृत्य कर्तृत्व - स्त्री . न . परमेश्वरी लीला ; ईश्वरकृत गोष्टी . ईश्वरकृति पहा . ०कळा स्त्री. ईश्वरीलीला ; परमेश्वरी कृत्य ; देवाचें कौशल्य , चातुर्य . ०कौतुक न. ईश्वरी लीला ; ईश्वरानें घडवून आणलेला चमत्कार ; परमेश्वराची सृष्टिरचना , नियमन व प्रारब्धाधीन गोष्टी यांना हा शब्द योजितात . ०गादी स्त्री. न्यायासन ; धर्मासन . ०चेष्टा स्त्री. परमेश्वरी कृत्य , खेळ ; ईश्वरी लीला , कला . ०जीव प्राणी - पु . सृष्टींतील प्राणी . योगी ; तापसी . ०तंत्र ईश्वरी घटना , योजना , कार्य , पध्दति ; सृष्टिव्यापार चालण्यासाठीं ईश्वरानें करुन ठेवलेली योजना . ०तेज न. सत्यशील माणसाचें तेज ; सात्त्विक माणसाच्या ठिकाणीं दिसून येणारी कांति , प्रभा . ( थट्टेनें ) तूप ; सोनें . ०देणें देणगी - नस्त्री . ईश्वरानें दिलेली देणगी ; प्रसाद . जन्मजात गुण ; दैवी गोष्ट . ०नाश पु. महाप्रलय ; जगाच्या शेवटीं होणारा मोठा जलप्रलय . ( ल . ) महासंकट ; अरिष्ट ; अनर्थ ; दैवी आपत्ति . ०नियम नेम नेमानेम - पु . दैवी घटना ; ब्रह्मलिखित ; सृष्टिनियम ०न्याय पु. देवाच्या घरचा न्याय ; खरा , वास्तविक न्याय . ०पराक्रम पु. दैवी सामर्थ्य , शक्ति . ०पसारा पु. ईश्वरनिर्मित सृष्टि , जग ; जगदुत्पत्ति . ०पुरुष पु. साधु , वैराग्यशील , पुण्यपुरुष . भोळा , सरळ वृत्तीचा माणूस . ०प्रसाद पु. ( प्र . ) ईश्वरप्रसाद ; देवाची कृपा . ०फळ न. देवानें दिलेली वस्तु ; देवाची देगणी . पुत्र . ०बल बळ - न . अचाट शक्ति ; असाधारण बळ ; ईश्वरी पराक्रम ; अलौकिक , अमानुष सामर्थ्य . ०भावना स्त्री. सत्प्रवृत्ति ; पुण्यशीलता ; साधुवृत्ति ; परमार्थनिष्ठा . महिमा पु . ईश्वराचें सामर्थ्य , श्रेष्ठत्व . ०माया ईश्वरमाया पहा . ०मुद्रा स्त्री. दैवी , तेजयुक्त , अत्यंत सतेज , तेज : पुंज अशी चर्या . ईश्वरी तेज पहा . ०यंत्र न. सर्व सृष्टी ; ईश्वरी तंत्र पहा . प्राणी , जीव , वनस्पति वगैरे ईश्वरनिर्मित वस्तुजात . ०लाभ पु. अकल्पित , अत्यंत मोठी प्राप्ति . ०लाल ईश्वराचा लाल पहा . ०लीला स्त्री. ईश्वरी कृति , खेळ ; परमेश्वरी कृत्य . ०वाचा स्त्री. देववाणी ; आकाशवाणी , साक्षात्कार वगैरे स्वरुपानें किंवा एखाद्या महात्म्याच्या मुखाच्या द्वारें प्रगट होणारी वाणी ; ज्ञान . ०संकल्प संकेत - पु . विधिघटना ; नेमानेम ; प्रारब्ध . ०साक्षात्कार पु. देवाचें प्रत्यक्ष दर्शन ; देवानें दाखविलेला चमत्कार ; दृष्टांत . ईश्वरसाक्षात्कार पहा . ०सूत्र ईश्वरसूत्र पहा . ०सोहळा पु. अत्यंत थाटाचा , शोभायुक्त उत्सव ; आनंददायक प्रसंग ( समाराधना , खेळ , मिरवणूक वगैरे ). कोणत्याहि देवाप्रीत्यर्थ केलेला उत्सवसमारंभ . परमेश्वराच्या या सृष्टींतील घडामोडी , मनुष्याच्या आयुष्यांतील प्रकार वगैरेंच्या चिंतनानें वाटणारा आनंद . ०क्षोभ पु. दैवी आपत्ति ; अरिष्ट .
|