Dictionaries | References त ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्हाईक काही घेईना Script: Devanagari Meaning Related Words ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्हाईक काही घेईना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक म्हातारी ताक विकीत असे. एकदा एक गिर्हाईक ताक विकत घ्यावयास आले असतां सून ते मोजून देत असतांना त्यांत एक माशी पडली. तेव्हां गिर्हाईक काही ते ताक घेईना. तेव्हां त्या म्हातारीने ते फुकट जाऊं नये म्हणून सुनेस पिऊन टाकण्यास सांगितले. पण माशी पडलेली असल्यामुळे ओकारी येईल या भीतीने सून ते पिण्यास कबूल होईना. अशा रीतीने त्या म्हातारीस मोठी पंचाईत येऊन पडली. ताक फुकट गेलेले तर तिच्याने बघवेना व सूनहि ते पिईना व गिर्हाईकहि घेईना. तेव्हां तिचा जीव थोडा थोडा होऊं लागला. अशा रीतीने अगदी बारीक सारीक गोष्टीनेहि नुकसान झालेले पाहवत नाही अशा वृत्तीच्या लोकांस अनुलक्षून ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP