युगांचें प्रमाण
ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
द्वात्रिंशद्भिः सहस्त्रैश्च युक्तं लक्षचतुष्टयम् ।
प्रमाणं कलिवर्षाणां प्रोक्तं पूर्वैर्महर्षिभिः ॥१६॥
युगानां कृतमुख्यानां क्रमान्मानं प्रजायते ।
कलेर्मानं क्रमान्निघ्नं चतुस्त्रिद्विमितैस्तदा ॥१७॥
पर्यायेंकरुन पुनः पुनः होणारें जें दीर्घ कालमान त्यास युग म्हणतात. हीं युगें चार आहेत. १ कृतयुग किंवा सत्ययुग, २ त्रेतायुग, ३ द्वापारयुग आणि ४ कलियुग. या चार युगांस चौकडी म्हणतात. कलियुगाचें प्रमाण ४,३२,००० वर्षै आहे. या संख्येला चोहोंनीं गुणिलें म्हणजे सत्ययुगाचीं, तिहींनीं गुणिलें म्हणजे त्रेतायुगाचीं आणि दोहोंनीं गुणिलें म्हणजे द्वापारयुगाचीं वर्षै निघतात. म्हणजे कृतयुगाचीं १७,२८,००० वर्षै, त्रेतायुगाचीं १२,९६,००० वर्षै आणि द्वापारयुगाचीं ८,६४,००० वर्षै होतात. चार युगें म्हणजे एक महायुग होतें. आणि एक हजार महायुगें मिळून एक कल्प होतो. प्रस्तुत कल्पाचीं एकंदर २७ महायुगें पुरीं होऊन २८ व्या महायुगांतील कृत, त्रेता आणि द्वापार अशीं तीन युगें गत होऊन सांप्रत चवथें कलियुग चाललें आहे. म्हणून पूजेच्या वगैरे नित्य संकल्पांत ‘ अष्टविंशतितमे युगे ’ असें म्हणतात. प्रत्येक युगाचें लक्षावधि वर्षोचें प्रमाण असल्यामुळें कांहीं तरी दीर्घकाळ अशा अर्थीही व्यवहारांत युग शब्दाचा उपयोग करितात. वेदांगज्योतिषांत पंचवर्षात्मक कालाला युग अशी संज्ञा दिलेली आहे.
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2012
TOP