हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
जन्मनक्षत्रादिकांवरुन शुभाशुभ

जन्मनक्षत्रादिकांवरुन शुभाशुभ

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


जन्मर्क्षमाद्यं दशमं च कर्मभं सांघातिकं षोडशभं च मानसम् ।

स्यात्पंचविंशं समुदायमष्टादशं त्रयोविंशतिभं विनाशकम् ॥९७॥

एवं षड्‍भो जनः सर्वो देशजात्यभिषेकभैः ।

नवभो नृपतिर्ज्ञेयो नाडी ताराः स्मृता अमूः ॥९८॥

एतासु नवसु प्राप्तैः क्रुरैरशुभसंभवः ।

सौम्यग्रहेण युक्तिश्चेद्विपरीतं फलं भवेत् ॥९९॥

जन्मनक्षत्र , तसेंच त्यापासून दहावें तें कर्मनक्षत्र , जन्मनक्षत्रापासून सोळावें नक्षत्र तें संघातनक्षत्र , अठरावें समुदायनक्षत्र , तेविसावें विनाशनक्षत्र आणि पंचविसावें मानसनक्षत्र ; हीं सहा नक्षत्रें सर्वानींच मंगलकार्यास वर्ज्य करावीं . याशिवाय राजानें देशनक्षत्र , जातिनक्षत्र व अभिषेकनक्षत्र हीं तीन आणि पूर्वोक्त सहा नक्षत्रें अशीं नऊ नक्षत्रें शुभकार्यास वर्ज्य करावीं . ही नऊ नक्षत्रें नाडीनक्षत्रें मानिलीं आहेत ; आणि या नऊ नक्षत्रांवर पापग्रह असतां दुःख व शुभग्रह असतां सुख प्राप्त होतें . इतरांनीं सहा नक्षत्रेंच वर्जावीं .

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP