हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
चंद्रबल किंवा शुभाशुभ चंद्र

चंद्रबल किंवा शुभाशुभ चंद्र

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


स्वजन्मराशिमारभ्य चंद्रराशिस्थितं फलम् ।

आद्ये चंद्रः श्रिय़ं कुर्यान्मनस्तोषं द्वितीयके ॥११४॥

तृतीये धनसंपत्तिश्चतुर्थे कलहागमम् ।

पंचमे कार्यनाशश्च षष्ठे संपत्तिरुत्तमा ॥११५॥

सप्तमे राजसंमानं दुःखदं चाष्टमे तथा ।

नवमे च भयं ज्ञेयं दशमे मानसेप्सितम् ॥११६॥

एकादशे सर्वलाभं द्वादशे हानिभेव च ।

शुक्लपक्षे शशिः श्रेष्ठो द्विपंचनवमेष्वपि ॥११७॥

सर्व् कार्यास चंद्रबल पाहावें असें सांगितलें आहे , म्हणून ज्या दिवशीं आपल्याला कांहीं कार्य करावयाचें असेल किंवा कोठें जावयाचें असेल त्या दिवशीं ज्या राशीला चंद्र असेल त्या राशीपर्यंत आपल्या जन्मराशीपासून राशि मोजाव्या , आणि पुढें लिहिल्याप्रमाणें शुभाशुभ चंद्र समजावा . पहिला चंद्र असेल तर लक्ष्मी , दुसरा मनाला संतोष , तिसरा धनसंपत्ति देणारा , चवथा कलहोत्पादक , पांचवा कार्यनाशक , सहावा संपत्तिप्रद , सातवा राजमान देणारा , आठवा दुःख देणारा , नववा भयदायक , दहावा मनाची इच्छा पूर्ण करणारा , अकरावा सर्व लाभ करुन देणारा आणि बारावा हानि करणारा , याप्रमाणें जाणावें . चवथा , आठवा आणि बारावा चंद्र सर्व कार्यास वर्ज्य करावा . अकरावा चंद्र सर्वात उत्तम मानिलेला आहे . शुक्लपक्षांतील दुसरा , पांचवा आणिं नववा हे शुभचंद्र मानिलेले आहेत .

कार्यपरत्वें इतर ग्रहांचें बल .

रविर्नृपविलोकने सुरगुरुर्विवाहोत्सवे

रणे धरणिनंदनो भृगुसुतः प्रयाणे बली ।

शनिश्च खलु दीक्षणे सकलशास्त्रबोधे बुधः

शशी सकलकर्मसु ध्रुवमुदाह्र्ताः सूरिभिः ॥११८॥

राजदर्शनकालीं रवीचें , विवाहास गुरुचें , युद्धकार्यांत मंगळाचें , प्रयाणकाळीं शुक्राचें , मंत्रदीक्षाग्रहणास शनीचें , विद्यारंभास बुधाचें , व सर्व कार्यास चंद्राचें याप्रमाणें कार्यपरत्वें ग्रहबल असावें असें ऋषिमत आहे .

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP