पद - नमनपर पद
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी
श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू
पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा
अनमोल ठेवा.
नमो गणराया मंगलमूर्तीं । सकल विबुधगण मंगल गाती ॥धृ०॥
रत्नजडित शिरिं मुकुट विराजे । कुंडलें कानीं हालती ॥१॥
दूर्वांकुरदळ शमिपुष्पांचे । हार गळ्यामध्यें डुलती ॥२॥
शुंडा - दंडित मोदक - मंडित । आयुधें करीं लखलखती ॥३॥
विष्णुदासाचे मनभृंगा । चरणकमल विश्रांती ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP