मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
तुळजाबाई

पद - तुळजाबाई

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : असा धरि छंद. )
तुळजाबाई ! ये धांवत माझे आई ! ॥ध्रु०॥
सकळ तूं विश्वाची माउली । श्रमितजन कल्पद्रुमसाउली
चिन्तितां बहुतांला पावली । देति श्रुति ग्वाही ॥ ये धांवत० ॥१॥
पुराणें म्हणति शोध लागला । दिनांची थोर काळजी तुला
हें सत्य प्रत्यया मला । येत कां नाहीं ? ॥ ये धांवत० ॥२॥
विषादें लपविसि तारकपाय । पतित मग भवनिधि तरतिल काय
क्षमा कर शतकोटी अन्याय । लागतों पायीं ॥ ये धांवत० ॥३॥
शरण मीं आलों कुलस्वामिनी ! तुझे गुण सकल गुणांहुनि गुणी
खुंटते ब्रह्माची लेखणी । आटली शाई ॥ ये धांवत ॥४॥
विष्णुदासास दान दे जुनं । वांचवी प्रेमामृत पाजुन
कथा किति गाउं अशा मोजुन । तुझ्या तुकाई ॥ ये धांवत० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP