पद - आई भवानी
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
आली आई भवानी स्वप्नांत ॥धृ०॥
श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ति । जशि विज चमके गगनांत ॥१॥
सरळ भांग, निळ भुजंगवेणी । काजळ ल्याली नयनांत ॥२॥
रत्नजडित हार, पीत पितांबर । कंचुकि हिरवी अंगांत ॥३॥
केशर - कस्तुरि - मिश्रित तांबुल । लाल रंगला वदनांत ॥४॥
कंकणें कनकाचीं खणखणती । वाजति पैंजण पायांत ॥५॥
विष्णुदास म्हणे अशिच निरंतर । दे आवडि मज भजनांत ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP