मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
ये सावळे अंबाबाई

पद - ये सावळे अंबाबाई

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


ये सावळे अंबाबाई, ग माझे आई रेणुके ॥धृ०॥
संसारतापानें, तापतसे ही तनु, जशी लाही लाही ग ॥
माझे आई० १॥
कर्माची कांचणी, वैर्‍याची जाचणी । सोसत नाहीं नाहीं ग ॥
माझे० २॥
ही वेळ स्वस्थचि नसे बसण्याची । येण्याची कर घाई घाई ग ॥
माझे० ३॥
जवळ नसे मृगराज, तुझ्या जरी । धांव तरी पायिं पायीं ग ॥
माझे० ४॥
धाकट्या बहिणीचि, करी पाठराखणी । वडील तूं ताई ताई ग ॥
माझे० ५॥
होतसे व्याकुळ, प्राण तुझ्याविण । भेट मला देई देई ग ॥
माझे० ६॥
याविण आणिक, धन मोती माणिक । नको मज कांहीं कांहीं ग ॥
माझे० ७॥
विष्णुदास म्हणे, रक्षुनिया दीन । सुकृत यश घेई घेई ग ॥
माझे० ८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP