पद - ही परम कृपेची माउली हो
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
ही परम कृपेची माउली हो । ही विश्रांतिची साउली हो ॥धृ०॥
ही लावण्यरुपचंद्रिका । रत्नमुद्रिका । विजयभद्रिका
अणु - रेणुका । माय रेणुका । इनें वेदवाणी बोलवली हो
इने सूर्याची गति चालवली हो ॥१॥
वसे सिंहाद्री पर्वतीं । लक्ष्मी सती । हीच पार्वती
हीच सरस्वति । सिद्ध गणपती । ही नाचवि भावला - भावली हो
संरक्षित पावला - पावलीं हो ॥२॥
ही कल्पलता शुभ - अंगा । मूळपिठ रंगा । निर्मळ गंगा
कलिमलभंगा । अचळ अभंगा । ही बहुत जनांला पावली हो
ही बहुत संक्टीं धांवली हो ॥३॥
ही प्रसन्नरुप सर्वदा । आनंदी सदा । चिंतिता पदा
वारि आपदा । देत निजपदा । इला प्रेमभक्ति मानवली हो
योग्यासी खुण जाणवली हो ॥४॥
ही षड्गुण - नारायणी । प्रणवरुपिणी । सकलसाक्षिणी ।
विश्वस्वामिनी । पदक जोडणी । हिनें विष्णुदासा लावली
इनें वाट सुखाची दावली हो ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP