संत चोखामेळा - परिपूर्णता समाधान
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
४४) आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला । देवोचि देखिला देहामाजी ॥१॥
देखणें ऊडालें पाहणें लपालें । देवे नवल केलें देहामाजी ॥२॥
मागें पुढें देव रिता ठाव कोठें । ह्रदयीं भेटें देहीं देवो ॥३॥
चोखा म्हणे देव देखिला पंढरी । उभा भीमातीरीं विटेवरी ॥४॥
४५) कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥
विधीतें वाळिलें निषेधा गिळिलें । सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥
वेदातें वाळीलें । शास्त्रातें वाळीलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देहीच भेटला एव आम्हां ॥४॥
४६) देवा नाहीं रूप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठाई ॥१॥
निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण । दोहींचें कारण तेच ठाई ॥२॥
चोखा म्हणे पाहतां पाहणें लपावे । ह्रदयीं बिंबले ह्रदयचि ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP