संत चोखामेळा - जोहार

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


१८८) कोपटी तळपती गाई । हाडाचीं बेडी पडेल पायीं । तोंड चुकवितां इज्जत जाई । मग वाचोनियां । काय कीजे मायबाप ॥१॥
जोहार पाटील बाजी । चावडी चलाना कां जी । ऐसें सांगत आलों आजी । बहुत बाकीं थकली की मायबाप ॥२॥
हिमायत येथें न चले कांही । दुस्तर वार्ता पुढें भाई । वरते पाय खालीं डोई । नव महिने होईल कीं जी मायबाप ॥३॥
उगलीं कां कोंडितां गुरें । गांवीची कां बुजवितां द्वारें । फेडा झाला बरोबर । नका उणें पुरें की मायबाप ॥४॥
यंदा आली चेवाची पाळीं । तोंडें कां जी करितां काळीं । चावडी चला या वेळीं । शिव्या गाळी घेऊं नका की मायबाप ॥५॥
कुळकर्णी आपुल्या स्वाधीन करा । आडखर्चाचा ताळा धरा । दयाळु मायाळु बाप करा । येईल मुजरा निजसत्वें की मायबाप ॥६॥
विठु पाटलाचा महार चोखामेळ्याचा जोहार । सकळ संतांचा कारभार । मज नफराचे शिरीं की जी मायबाप ॥७॥

१८९) जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥
बहु भुकेला जाहलों । तुमच्या उष्टयासाठीं आलों ॥२॥
बहु केली आस । तुमच्या दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्टयासाठीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP