संत चोखामेळा - भाव
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
१७७) आमुचा आम्ही केला भावबळी । भावें वनमाळी आकळीला ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । भावें देव शरण भाविकासी ॥२॥
निज भावबळें घातिलासे वेढा । देव चहूंकडा कोंडियेला ॥३॥
चोखा म्हणे देव भावाचा बांधला । भक्तांचा अंकिला म्हणुनी झाला ॥४॥
१७८) शुद्ध भाव शुद्धमती । ऐसें पुराणें वदती ॥१॥
जयासाठीं जप तप । तो हा विश्वाचाचि बाप ॥२॥
नामें पातकी तारिले । जड जीव उद्धरिले ॥३॥
विश्वास दृढ धरा मनीं । चोखा मिठी घाली चरणीं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP