संत चोखामेळा - प्रसाद
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
१९०) वासुदेव दिंडी गान । प्रसाद मागूं आले दान । आणिक आले कोण कोण । त्यांची नावें परिसावी ॥१॥
ब्राम्हाण क्षत्रिय शूद्र वाणि । मागूं आल्या चारी खाणी । लिहिणार जोशी पंडित गणीं । चाटे भाट आले ते ॥२॥
गोंधळ डफ गाणें बहीरव जोगी । बाळसंतोषी आणि बैरागी । फकीर डाकुलता तो वेगी । कान फाडया आला तो ॥३॥
सारमंडळी आलासे । राहा विनोदें बोलतसे । चोखा महार जोहार करितसे । प्रसाद देई म्हणोनी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP