जनमेजय भूप पुसे, “वैशंपायनमुने ! मला सांगें, ।
त्र्यक्षापासुनि कैसा त्रिपुरवध ? ज्ञानसिंधु तूं आंगें.” ॥१॥
“श्रवण, मनब, आणि निदिध्यासन, हीं तीन अक्षसप ज्याला. ।
दर्शनसाधनविद्वान् जो, म्हणति ‘त्र्यक्ष’ जाणते त्याला. ॥२॥
जें स्थूल, सूक्ष्म, कारण, देहत्रय, हें ‘पुरत्रय’ स्पष्ट; ।
याचा उच्छेच कसा ज्ञानें ? तें कथुनि, तूं हरीं कष्ट.” ॥३॥
ऐसा या जनमेजयभूपप्रश्नांत गूढ हा भाव, ।
जाणे वैशंपायंन, वक्त्यांचा साधुमान्य जो राव. ॥४॥
श्रीव्यासच्छात्र म्हणे, “दैत्याचें निधन शंकरें केलें, ।
शूलत्रयें करुनि, तें कथितों, जें मन्मनीं सदा ठेलें. ॥५॥
‘शंकर’ म्हणजे बोध; श्रवणमनन तीन साधनें ‘शूळ;’ ।
‘कामक्रोधादि’ असुर, देव ‘शमादि;’ श्रुतीच या मूळ. ॥६॥
जाग्रत्स्वप्नसुषुप्तात्यभिमानी विश्व तैजस प्राज्ञ, ।
यांहीं भोग्य ‘पुरत्रय’ मायागुणरचित, जाणती प्राज्ञ. ॥७॥
उठलें तें आकाशीं, म्हणजे जें प्रकट ‘कारणीं’ झालें, ।
प्राकार ज्यासि कांचनमय, ‘अन्नमयाकडेचि हें आलें. ॥८॥
कीं होय भोगमुक्त्युपयोगी, रमणीय यास्तव स्थूळा ।
‘कांचनमय’ म्हणणें, हे व्याख्या सर्वा बुधासि अनुकूळा. ॥९॥
मणिंहीं परमविराजित, ‘माणि’ म्हणजे इंद्रियें असें जाणा. ।
पिंडाला नगराची शोभा योग्या असेल, ती आणा. ॥१०॥
कर्मेकरुनि पुरत्रयसाधित ‘यज्ञादिकर्म; जाणावें, ।
‘गंधर्वपुर तसें’ तें, म्हणजे ‘मिथ्या’ असेंचि बाणावें. ॥११॥
वाहति पुरासि वाजी, म्हणजे, ते ‘इंद्रियाश्व’ समजावे, ।
या सुरहस्यज्ञानें हृदयगुहेंतील सर्व तम जावें. ॥१२॥
‘त्या पार्श्वांहीं असुर ग्रासिति अंबर सुवेग ते,’ म्हणजे, ।
‘जें ब्रम्हा कारण, तया झांकिति कामादि विजयकृतपण जे.’ ॥१३॥
‘समलंकृत कनकप्रभ भवनें त्रिपुरस्थ निर्मिलीं यत्नें,’ ।
म्हण्जे ‘मन;प्रवेशस्थानें हीं वर्णिलीं वधूरत्नें,’ ॥१४॥
‘रम्यें गृहोपरिगृहें,’ म्हणजे, ‘नाना मनोरथ’ व्यक्त ।
कथिले बहु सुज्ञांहीं, जेथें जन होतसे सदा सक्त, ॥१५॥
‘बहु आयुधें पुरीं त्या,’ ‘स्त्रक, चंदन, कामिनीकटाक्ष, असे, ।
कामाचे जदीपक अर्थ,’ बुधमनांत भाव हावि ठसे. ॥१६॥
ऐशा त्रिपुरांत वसे असुरेश्वर ‘सूर्यनाभ अध्यक्ष, ।
तैसाचि ‘चंद्रनाभ’ हि, यांसि, म्हणति ‘चक्षु’, ‘मन,’ असें दक्ष. ॥१७॥
अन्यहि बहु दानव त्या त्रिपुरीं ‘मदमत्सरादि,’ ते कथिले, ।
पथ मोडिले पुरातन यांहीं, प्राणी सुरादि बहु मथिले. ॥१८॥
त्रिपुरोपद्रुत झाले देवादि समस्तही स्वसुखहीन, ।
ब्रडयातें दु:ख कथिति, ते गेले ईश्वरा शरण दीन, ॥१९॥
ईश्वर म्हणो तयांतें, “रे ! सुर ! हो ! शंकराविना अन्या ।
दानव अवध्य जाणा,” कथिली हितहेतुयुक्ति हे धन्या. ॥२०॥
‘शंकर’ म्हणजे सुखकर, कथिला प्रणतांसि ईश्वरें बोध. ।
गेले शरण तयातें, तत्वाचा लागले करूं शोध, ॥२१॥
ते शंकरासि गेले शरण सकळ देव, उग्र तप तपले, ।
जप लेशहि न विसरले, यमनियमांतें सदैवही जपले. ॥२२॥
त्या सुरतप:प्रभावें, जे दानवदार, सर्वही भ्याले; ।
बहु कामादिपरिग्रह तृष्णादिक, दीन तेधवां झाले. ॥२३॥
वैराग्य यांत कथिलें, जें पुण्यसुखर्धिचें महापर्व; ।
ते कामकोपतृष्णाहिंसादि, दरिद्र जाहले सर्व. ॥२४॥
केवळ दुर्बळ होतां क्षीण, न उरलीच शक्ति कांहींच, ।
ते पावले अदर्शन, झाले दानव समस्त नाहींच. ॥२५॥
ते गुप्त अंतरिक्षीं झाले मायाबळें असुरभूप, ।
हृदयाकाशीं बसले, होऊनियां लीन वासनारूप. ॥२६॥
परिपाककाळ येतां योगाचा, देवशत्रु बाधाया ।
बसले जपत सुदारुण मायावी ते स्वकार्य साधाया. ॥२७॥
ऐसें होतां, गेले सुर शरण हरालयासि योगाच्या, ।
विजयी झाल्या असतां क्षीणा त्या वासना कुभोगाच्या. ॥२८॥
अधिकारी संसारी होऊनि उद्विग्न, निर्गुणस्थानीं, ।
ज्या प्राप्त होय, हृदयाकाशीं, तेथेंचि लागले ध्यानीं. ॥२९॥
शांत्यादि देव भावें भगवंता ईश्वरा पदीं नमुनी, ।
शुद्धब्रम्हाविनिश्वय करिति, जरी त्यासि देखती न मुनी. ॥३०॥
देव हरासि न पाहुनि, भगवंतातेंचि विनविता भावें, ।
कीं “मलिनबुद्धि आम्ही, स्ववर करायासि सत्य तूं पावें.” ॥३१॥
सिद्ध महादेव प्रभु झाला, ते सुर भयांत ताराया, ।
अभिमत उपासकांतें होय अविद्याभ्रमासि वाराया. ॥३२॥
रुद्रसहित रुद्राची शोभा न शके वदावया वाणी, ।
शोभति उपासनेनें ध्यातेश्वरसह उपासक प्राणी. ॥३३॥
त्रिपुराणीं युद्ध करी त्र्यक्ष, सशर धनु धरूनि अतिसत्व; ।
विद्वान अणवीं योजुनि चित्त, करी कोशभंग हें तत्व. ॥३४॥
त्र्यक्षें शरसंधानें दैत्य सकल भिन्नतेह ते केले, ।
स्थूळाध्यास उडवितां ध्यानें कामादि नष्टतनु ठेले. ॥३५॥
कामादि असुर दिवसीं बोधीं खचल, न राहिले कांहीं, ।
झाले शनादि सुरही मग रात्रिमुखीं लयी तयीं नाहीं. ॥३६॥
रात्रींत प्रबळ असुर होऊनि, देवांसि जिंकिती शूर; ।
कामादि बळी स्वप्नीं, होति शमादिक तयांपुढें चूर. ॥३७॥
होय सुषुप्तींत असा विक्षेप, असें रहस्य मुनि कळवी; ।
हा विघ्न योगिह्रदया सहसा सावधपणांतही मळवी. ॥३८॥
कीं शुक्रें आप्यायित केले ते दैत्य सर्वही हव्यें, ।
पाखंडमार्ग सेवुनि कामादि प्रसरती बळें नव्यें. ॥३९॥
दिव्यरथास्थत शंकर गर्जुनि, दैत्यांसि संगरीं दापी, ।
सूक्ष्म शरीर अधिष्ठुनि, योगी गर्दी, स्मरादि जे, पापी. ॥४०॥
देवांनीं, सिद्धांनीं, बहु तो शंकर वृषध्वज स्तविला, ।
योगजधर्मसमुच्छ्रित म्हणति ‘वृषध्वज’ म्हणोनि या कविला. ॥४१॥
असुरांहीं नानाविध शस्त्रांहीं सरथ पाडिला रुद्रा, ।
योगी सूक्ष्मशरीरीं तो विघ्नें पीडिला,जसा क्षुद्र. ॥४२॥
स्तुति होतां, गर्वें जो ‘सुस्थित झालों,’ असें मनीं मानी, ।
त्या योग्यातें सूक्ष्मीं देहींहि प्राप्त होतसे हानी. ॥४३॥
भूमि मधुमती तेथें राहुनि, कामादि सूक्ष्मदेहींच्या ।
शुभवासना विनाशिति; कलि, अनय, जसे समृद्धि गेहींच्या. ॥४४॥
शब्दादि दिव्यविषयप्राप्तिच विक्षेप सांगती सुकवि, ।
लान ध्येयेश्वरसह सूक्ष्मवपुहि होय लय, असें चुकवी. ॥४५॥
शंकर तेव्हां कुंठिणगति होय, शकट जसें पथीं भग्न. ।
कीं त्या लयांधकारामध्यें योगींद्र जाहला मग्न. ॥४६॥
ऐसें होतां विघ्न, प्रकटे वृषरूप विष्णु रक्षाया, ।
कीं तो शंकर भजला होता श्रितरक्षणैकदक्षा या. ॥४७॥
हा धर्म तमोमग्ना जीवांतें उद्धरावया दक्ष, ।
एणंचि समुद्धरिले स्वाश्रित, पावोनि संकटीं, लक्ष. ॥४८॥
चेतोरथ उद्धरिला, तिसर्या विषयांत वायुच्या नेला; ।
हे लिंगभूमि जिंकुनि, योगी धर्माश्रयें पुढें गेला. ॥४९॥
भमि महत्तत्वाख्या, जीमध्यें एक अस्मिता मात्र ।
प्रत्यय; तत्प्राप्तीतें योगी धर्मेंचि जाहला पात्र. ॥५०॥
न स्फुरति विषय जेथें, अति शुद्ध त्वंपदार्थ मात्र उरे, ।
तेथेंहि असुर उठले, म्हणताति, ‘प्रकृतिलय जयासि पुरे. ॥५१॥
तेव्हां रद्र धनुष्यीं अग्नि स्थापूनि, दिव्य शर जोडी, ।
त्या दैत्यांच्या तिसर्या नगरीं ब्रम्हास्त्रयुक्त मग सोडी. ॥५२॥
‘अग्नि महावाक्य, धनु प्रणव, चिदाभास होय दिव्य शर, ।