श्री स्वामी समर्थ - आज मी
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!
प्रज्ञानगरी समर्थरुपे दत्तात्रय पाहिले
आज मी दत्तात्रय पाहिले
ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही
एकरुप जाहले लोचनी
अनसूयेचे बाळ सुकोमल अवनीवर प्रकटले
आज मी दत्तात्रय पाहिले
शांत निरामय ध्यान हरीचे
हास्य मुखावर शशिबिंबाचे
जनार्दनातच अवघे स्थिरचर एकरुप जाह्ले
आज मी दत्तात्रय पाहिले
विश्वरुप हा ब्रह्म सनातन
मुनिजन करिती अखंड चिंतन
आशीर्वच हा ईश कृपेचा, कृतार्थ जीवन झाले
आज मी दत्तात्रय पाहिले
सकलांचा हा एकच त्राता
आत्मवंचना सरली आता
आपपराचा दंभ न उरला, अंतर शुध्द जहाले
आज मी दत्तात्रय पाहिले
N/A
References : N/A
Last Updated : April 18, 2022
TOP