श्री स्वामी समर्थ - आलो तुझिया दारी
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!
आलो तुझिया दारी
सदया, आलो तुझिया दारी
दिशाहीन मी झालो आता
घोर लागला अवघ्या चित्ता
व्याकुळ वेडे तनमन सारे
माझे मन मज वैरी
सदया, आलो तुझिया दारी
आव आणती सगळे खोटा
दांभिकतेचा असे मुखवटा
किती तुडविल्या वाटा अवघड
फसगत झाली सारी
सदया, आलो तुझिया दारी
आसक्तीचे फसवे जाळे
मुक्त व्हावया जीव तळमळे
तुझ्या चिरंतन वात्सल्याची
देई मला शिदोरी
सदया, आलो तुझिया दारी
तू असता मी नसे पोरका
माता न करी दूर बालका
तुझ्या कृपेचा वरदहस्त मज
लाभो या संसारी
सदया, आलो तुझिया दारी
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2022
TOP