श्री स्वामी समर्थ - दयासागर
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!
स्वामी दयेचे सागर हो
अवधूताच्या नामकीर्तनी
तल्लिन मन हे झाले हो
नित्य तयाची गाता गाणी
मन स्थिर होते समर्थ चरणी
मम मानसमंदिरी गुरुचे
रुप गोजिरे ठसले हो
स्वामी दयेचे सागर हो
औदुंबरि, वाडीस पाहिला
गाणगापुरी त्यास पूजिला
अक्कलकोटी समर्थ रुपे
तोच दिगंबर रमला हो
स्वामी दयेचे सागर हो
हृदयी अमुच्या वसे नरहरी
भक्तिसुधेचा दीप अंतरी
गुरुचरित्र हे गाता गाता
जीवन सुखमय झाले हो
स्वामी दयेचे सागर हो
N/A
References : N/A
Last Updated : April 21, 2022
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP