श्री स्वामी समर्थ - तूच मला सावरीदारी
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!
वादळ वाहे घनअंधारी
तूच मला सावरी
दीपहि विझले, विझले अंतर
अंधाराचे भय ते कातर
दिशाहीन ही नाव वाहते
मन माझे वैरी
तूच मला सावरी
तू स्वामी या संसाराचा नावाडी तू भवसिंधूचा
पार करी मज
नेई पैलतिरी
तूच मला सावरी
शिणले डोळे वाट पाहता
धीर नसे या व्याकुळ चित्ता
ये लवलाही अवधूता तू
संकट दूर करी
तूच मला सावरी
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2022
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP