श्री स्वामी समर्थ - अवघाची आनंद
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!
मी याचक तू दाता
मी बालक तू माता
करुणासागर म्हणती तुजला
कृपा करी श्रीदत्ता
तुझे आठवू रुप
सरे व्याप संताप
घनअंधारी मार्ग दावितो
भक्तीचा हा दीप
भक्तांचा तू देव
निर्मळ भोळा भाव
संत सज्जनी दंग कीर्तनी
रंगुन जाई जीव
सगुण रुप तव दिसता
मोद होतसे चित्ता
अंतर्यामी तुला साठवू
स्वामी श्री अवधूता
उच्च नीच ना भेद
अवघाची आन्म्द
धन्य जाहला जीव आजला
स्मरताना गोविंद
N/A
References : N/A
Last Updated : April 21, 2022
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP