श्री स्वामी समर्थ - या भवनदीतून

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!


या भवनदीतून पार करी मज
त्रिभुवनपालक दत्ता रे !

श्री गंगेचा वास मस्तकी
शशिबिंबाचे भूषण रे
जटाजूट शिरि पायि खडावा
अनसूयासुत येई रे
या भवनदीतुन पार करी मज
त्रिभुवनपालक दत्ता रे !

सामगायने करिती मुनिजन
प्रसन्न तुजला नरहरि रे
भक्तांसाठी येशी धावत
वत्सल तू तर माता रे
या भवदीतून पार करी मज
त्रिभुवनपालक दत्ता रे !

तीन शिरे, कर सहा शोभती
प्रसन्न वदनी दत्ता रे
येई धावत शिणले अंतर
नाही तुजविण त्राता रे
या भवदीतुन पार करी मज
त्रिभुवनपालक दत्ता रे !

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP