श्री स्वामी समर्थ - नीज नीज दत्तात्रया
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी महामानव!
बा नीज सुखे बाळा स्वामी सदया
नीज नीज दत्तात्रया
मी जोजविते माता तुज अनसूया
नीज नीज दत्तात्रया
त्रिगुणात्मक तू असशी रे लडिवाळा
मी केले तव प्रतिपाळा
या भूमीचा तूची पालनहार
पतितांचा करि उध्दार
तू भक्त सखा झालासी
त्या हृदयी तू वसलासी
ते स्थान तुझे अविनाशी
त्या युगे युगे लाभो तुझीच छाया
नीज नीज दत्तात्रया
विश्वात्मक तू ब्रह्म सनातन थोर
तव माया अपरंपार
भवसागर तू करुन देशी पार
संकटी तुझा आधार
अवतार तुझा यतिवेषी
तू प्रयाग आणिक काशी
माहेर मुक्तिंचे असशी
बा करुणेशा स्वामि समर्था राया
नीज नीज दत्तात्रया
मी जोजविते तुझा पाळणा राया
नीज नीज दत्तात्रया
N/A
References : N/A
Last Updated : April 21, 2022
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP