संगीत सौभद्र - किती सांगु तुला मज चैन नस...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
किती सांगु तुला मज चैन नसे ॥धृ०॥
हे दुः तरी मी साहु कसे । या समयि मला नच कोणी पुसे ।
हा विरह सखे मज भाजितसे (चाल) मन कसे आवरू ।
किती धीर धरू । कस करू । कि० ॥१॥
हे बंधु नव्हत मम वैरी खरे । दावीती कसे वरि प्रेम बरे ।
बोलोनी पाडिती ह्रदयासी घरे । (चाल) नको नको मला जिव । विष तरि पाजिव ।
सखे सोडिव । कि० ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016

TOP