दुर्मुखलेला
केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.
( शार्दूलविक्रीडित )
माझें शुष्क खरेंच हें मुख गुरो ! आहे, तया पाहुती
जाती प्रेक्षक सर्वही विरस ते चित्तामधीं हौउनी;--
हें सर्वां उघडें असूनि वदुनी कां तें तुम्हीं दाविलें ?
तेणें भूषण कोणतें मग तुम्हां संप्राप्त तें जाहलें ?
याचें तोंड कुरुप हें विधिवशात् गाईल काव्यें नदीं,
तेणें सर्वहि डोलतील जन हे हषें कदाचित भुवि !”
विद्यासंस्कृत त्या तुझ्या, क्षणभरी, मस्तिष्कतन्तूंवरी
येता नम्र विचार हा तुज भला होता किती तो तरी !
जे मुंग्या म्हणुनी मनीं समजशी या मंडळीभीतरीं,
ते पक्षी उडतील होउनि गुरो ! योमीं न जाणों न जाणों वरी !
राखेचीं ढिपळें म्हणोनि दिसतीं जीं तीं उद्यां या जना
भस्मीसात् करणार नाहींत, अशी तुम्ही हमी द्याल का ?
माझ्या दुर्मुखल्या मुखामधुनि या, चालावयाचा पुढें
आहे सुन्दर तो सदा सरसवाङनिष्यन्व चोहींकडे !
तुम्हीं नाहिं तरी सुतादि तुमचे धातील तो प्राशुनी !
कोणीही पुसणार नाहिं, ’ कवि तो होता कसा आननीं ?’
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP