मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
अहा पक्षी हे चित्र पक्ष यांचे !

अहा पक्षी हे चित्र पक्ष यांचे !

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


दिंडी
अहा पक्षी हे ! चित्र पक्ष यांचे !
पैल जाती निश्चिन्त वारिधीचे;
सुखी खग हो ! एवढें मला बोला,
पंख ऐसे मिळतील कधीं याला ? ॥१॥
जिचे तुलनेला जगीं नसे कोणी
अशी मम तूं चन्द्रिका रूपखाणी !
गडे चन्द्रे ! लागलों जर उडाया,
उन्हातान्हांतुनि झटूं कुठें जाया ? ॥२॥
न त्या कमलीं, किति जरी दिव्य झालें;
परी अगनग लंघुनी, मधुर बाले,
ओठ तव, जे स्मित दाविती मधून,
सखे ! चुम्बुनि ते, सुखें मग मरेन ! ॥३॥
ऑगस्ट, १८८८.

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP