खिडकीकडे मौज पहावयास
केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.
श्लोक
मजा पहायास विलोल बाला
सौधांवरी कांचनयुक्त जाला
तयीं त्वरेनें लगटून येती,
राहोनि अन्य व्यवहार जाती. ॥१॥
जाळीकडे एक जवें निघाली,
कचांतलीं बन्धनमुक्त झालीं -
पुष्पें न बांधूं सुचलें तियेस,
रोधी करें ती जरि केशपाश. ॥२॥
कोणी, सखी रंगवितां पदाला -
ओढून, ये तूर्ण पहावयाला;
लीलागती विस्मरली सदाची,
अलक्त चिन्हें उठलीं पदाचीं ! ॥३॥
एकांत जों अंजन लोचनांत -
घालूनि, घालूं म्हणते दुज्यांत,
तशीच ती धांवुनि ये गवाक्षीं
काडी करीं राहुनि कुड्मलाक्षी ! ॥४॥
कोणी गवाक्षीं निजदृष्टी फेंकी,
नीवि त्वरेनें फिटली तिची कीं,
हस्तें निर्या आकळुनीच ठाके,
नाभींत तत्कङ्कणकान्ति फाके ! ॥५॥
अन्या त्वरेनें उठली पहावया,
लागे पदांच्या स्खलनीं गळावया
ती ओविती जी पुरती न मेखला,
अंगुष्ठमूलीं गुणमात्र राहिला ! ॥६॥
लोलाक्ष हे भ्रमर ज्यांवरि शोभतात,
आहेहि आसवसुवास भरून ज्यांत,
त्या त्यांचिया सुवदनीं खिडक्या भरूनी
गेल्या - जणूं सजविल्याच सरोरुहांनीं ! ॥७॥
नोवेंबर, १८८५. रघुवंशे श्रीकालिदासः
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2017
TOP