मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
कामान्धत्व

कामान्धत्व

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


``O me ! what eyes hath love put in my hand ''
- Shakespeare.
श्लोक
कामानें मजला अहो ! कुठुनि हे डोळे दिले कायसे ! -
वस्तूंची स्थिति ती खरी न मजला योगें तयांच्या दिसे;
किंवा ते बघती खरें जर म्हणूं, कोठें पळाली मति ? -
जी दे दोष मदीय नेत्रविषया, जाणूं कशी सत्य ती ? ॥१॥
खोटे नेत्र मदीय जें बघति तें आहे जरी सुन्दर,
तैसें तें न असे, म्हणोनि जग हें बोले बरें कां तर ?
तें नाहीं रमणीय हें जर खरें, आहे खरें हें तरी -
लोकांचीं नयनें तशीं न असती कामी जनाचीं खरीं. ॥२॥
त्रस्तें जीं अवलोकनें, भरुनि जीं बाष्पांमुळें राहिलीं,
तथ्यालोकनदक्ष कामिनयनें व्हावींत तीं कोठलीं ?
माझ्या या नयनां दिसे न, म्हणुनी आश्चर्य नाहीं मुळीं,
अभ्राच्छादित तें बघूं न शकतो आदित्यही तो बळी. ॥३॥
व्यंगें प्रियेचीं बघतील, मोकळे
कामी जनाचे जर नेत्र राहिले,
म्हणूनि का आणुनि त्यांत आसवें,
हे धूर्त कामा ! करितोस आंधळें ? ॥४॥
नोव्हेंबर, १८८८.

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP