तत्त्वतः बघतां नामा वेगळा० इत्यादि
केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.
ओवी
तत्वतः बघतां नामा वेगळा,
कोण नाईं सांगा मजला ?
भिन्नव्यक्तित्व नामाला
नामकरण होतसे. ॥१॥
नाम म्हणजे अभिधान,
अभिधान ह्मणजे जें वरून
धारण केलें, ज्यामधुन
अन्तःसाक्ष पटतसे. ॥२॥
भावशब्दस्पर्शहीन
तैसे रूपरसगंधांवांचुन,
अतएव ते विषय जाण
इन्दियांचे नव्हेत. ॥३॥
ही तों वाणि मिथ्या वाटे,
कारण पंचविषयांचे थाटें,
भाव नटती खरें खोटें
विचारुनी पाहिजे. ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2017
TOP