साधन मुक्तावलि - उत्थान लक्षणें
’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.
सदा मज ज्ञानचि स्फुरतसें । आतां आज्ञान कोठें असे ॥
मीच मिळे अखंडैक रसें । हें जाण उत्थान ॥१॥
मीच ब्रम्हानंद सेवित । मीच कीं झालों निवृत्त ॥
मी प्रवृत्तींत असे निवांत । हें जाण उत्थान ॥२॥
मन - बुद्धिसहित इंद्रिय । हें सहसाही सुप्तिपरि उठों नये ॥
कोणतेंच अंतरीं कळों नये । हेंचि उत्थान ॥३॥
मी ब्रम्हाचि अंगें होईन । येर द्दश्यभान त्यागीन ॥
साध्यालागीं साधनें साधीन । हें जाण उत्थान ॥४॥
स्वरूपानुसंधान कदा न सोडीन । ध्यान मी आपला करीन ॥
सदा अनुसंधानीं बुडी मारीन । हें जाण उत्थान ॥५॥
अपुले करणीचा साभिमान । येर अवघे निकृष्ट जन ॥
मजहून मानी ज्ञाता असे कवण । परी तो भ्रांत अनधिकारी ॥६॥
उपासनेचा साक्षात्कार । तेणें परमार्थ वाढळा दिसे अपार ॥
शब्दज्ञानचि म्हणतसे सार । परी तो भ्रांत अनधिकारी ॥७॥
रजोवृद्धीचें कारण । देहीं उपजें ज्ञानाभिमान ॥
पदोपदीं देखिजे दोषगुण । वांछी सन्मान प्रतिष्ठा ॥८॥
बरें वाइटपण हें उमसतां । सर्व मित्थ्यासी येतसे सत्यता ॥
तेव्हां सत्यासि मुखीं न बोलता । मित्थ्यात्व आलें ॥९॥
बाहेर दिसे सात्विक स्थिती । अंतरीं दुर्वासना कामासक्ति ॥
ज्यासि प्रिया आवडे चित्तीं । तो जाण निश्चितीं राजसु ॥१०॥
नवल रजोगुणाची ख्याती । ज्ञातेपणें कामासक्ति ॥
नाना भोग वांछी चित्तीं । तेणें रजाची प्राप्ती अनिवार ॥११॥
तस्मात् साधकें हीं उत्थानें त्यागू न । निजांगेंचि व्हावें वृत्तीवीण ॥
अभंग.
असंग मी परी व्यापार रहावे । हें रूप जाणावें उत्थानाचें ॥१३॥
वृत्तीहि मुगेनि निर्विकल्प व्हावें । हें रूप जाणावें ० ॥१४॥
आत्मा सुखी परी सुखदु:ख न व्हावें । हें रूप जाणावें ० ॥१५॥
असंग असोनि सर्व संग जावें । हें रूप जाणावें ० ॥१६॥
समाधीसि सुख व्यापारीं तें नोहे । हें रूप जाणावें ० ॥१७॥
असत्य हें खरें परी सर्व जावें । हें रूप जाणावें ० ॥१८॥
मित्थ्या असोनिया सत्यत्व कल्पावें । हें रूप जाणावें ० ॥१९॥
नामरूपालागी मनें आठवावें । हें रूप ० ॥२०॥
अभेदाचे ठायीं भेदचि वाटावें । हें रूप ० ॥२१॥
तूं एक मी एक उंचनीच पाहावें । हें रूप ० ॥२२॥
हा स्वर्ग हा नर्क वाईट बरें फावें । हें रूप ० ॥२३॥
पुण्य तें चांगुलें पाप न घडावें । हें रूप ० ॥२४॥
अकर्ता आपण परी करणें नसावें । हें रूप ० ॥२५॥
अहंकाराचें कार्य आपुले माथां घ्यावें । हें रूप ० ॥२६॥
ध्येयासि सांडोनि आंगें ध्याता व्हावें । हें रूप ० ॥२७॥
साध्य असोनिया बळें साधू जावे । हें रूप ० ॥२८॥
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2015
TOP