मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - श्रीसमर्थस्तवराज

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


पद.

रामदास माउली । अनाथाची रामदास माउली ० ॥धृ०॥
सच्चित् सुख - घन वरद प्रतापी । शांतीची सावली ॥ अनाथा ० ॥१॥
अनन्य जे नर शरण रिघाले । तयालागीं पावली ॥ अना ० ॥२॥
केशवीं केशव निजसुख सेवी । आठवितांची धांवली ॥ अना ० ॥३॥

श्लोक.

परंधाम चिद्रूप व्यक्तीसि आलें ॥ समर्थ स्वरूपेंचि विख्यात झालें ॥
परब्रम्हा प्रत्यक्ष या लोकभावें ॥ नमो सद्नुरू रामदासासि भावें ॥१॥
पराकाश सारांश घेऊनि वेगीं ॥ जना द्यावया पातले अंतरंगीं ॥
सदां उन्मनीं नंद जे मी स्वभावें ॥ नमो सद्नुरू रामदा ० ॥२॥
तपस्वी तनू - तेज वैराग्यलीला ॥ कळे आकळे चित्कळेचा जिव्हाळा ॥
उदासीन - वृत्तीं अरण्यीं बसावें ॥ नमो ० ॥३॥
क्षणामाजिं काया रुपें पालटावीं ॥ अकस्मात त्या भाविका भेट द्यावी ॥
महद्भूतसंचार अद्दश्य व्हावें ॥ नमो ० ॥४॥
महारुद्ररुपें लोकीं प्रसिद्धि ॥ क्षुधा ना तृषा नित्य तृप्ती  समाधीं ॥
महापर्वतीं काष्टरूपीं पडावें ॥ नमो ० ॥५॥
उडी घातली ती नदीचे प्रवाहीं ॥ बुडाली तनूची जया शुद्धि नाहीं ॥
कितेका काळिचे प्रवृत्तीसि यावें ॥ नमो ० ॥६॥
धनूपाणिचे रामसौमित्रसंगें  ॥ बसावें पुजावें स्वहातां तरंगे ॥
वनीं वानरें क्रीडती तेथ जावें ॥ नमो ० ॥७॥
त्रेतायुगीचा राम आला कलीला ॥ जनां दाखवी सत्वरूपें स्वलीला ॥
जनां दर्शनीं पै विरक्तीसि यावें ॥ नमो ० ॥८॥
महोत्साह हा चाफळीं नित्य नेमीं ॥ भरे विश्वयात्रा महा रान्मनामी ॥
घनानंद संकीर्तनीं मग्न व्हावें ॥ नमो ० ॥९॥
बहु योग या सांपदायीं ॥ घडे प्राप्ति कैवल्य श्रीरामपायीं ॥
समर्थाचिया आठवें उद्धरावें ॥ नमो ० ॥१०॥
जिणें निश्चयें घोर संसार वैरी ॥ समर्थानुज्ञ कृपें नानाधिकारी ॥
विरक्तीस प्रचीत मेरू करावें ॥ नमो सद्नुरु रामदासासि भावें ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP