मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - जनस्वभाव

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


आपण तरी भलतैसें वर्तावें । परी अन्याप्रति नांव ठेवावें ॥
शास्त्रसंपन्न जरी असावें । हेचि रीती सर्वांची ॥१॥
सर्व मिथ्या हें तरी नेणती । असत्यासी सत्यत्वें स्थापिती ॥
आम्ही सत्यवादीही म्हणविती । लौकिकीं खरें बोलूनी ॥२॥
धीटपणें भलतें करी । मुक्तपणा दावीं वरीं ॥
परी स्मरतसे अंतरीं । बरें अथवा वाईट ॥३॥
पहा पहा जन कैसे अंधळे । म्हणती पिंडासि शिवले जरी कावळे ॥
तरी तो उत्तम गतीसी मिळेल । ना तरी अधम गती ॥४॥
हें असो अधिकारावीण । करिती जे कां वेदांत - श्रवण ॥
मुखें बडबडती ज्ञान । ते ते पाखंडी ॥५॥
मुखीं ज्ञान बोले सैरा । परी अंतरीं द्रव्यदारा ॥
पुत्र - कामीं जो घाबरा । ते ते पाखंडी ॥६॥
रुका वेंचितां जाय प्राण । सर्व मिथ्या हें बोले वचन ॥
आपले करणीचा साभिमान । ते ते पाखंडी ॥७॥
शब्दिं सर्व आत्मा म्हणावें । आणि आचार सांडोनि भलतेंचि करावें ॥
ते पाषंड मत्त जाणावें । विवेकी असेल तेणें ॥८॥
नातरी माझें कांहीं नाहीं वरीं वरीं । बोलतसे परी कळवळी अंतरीं ॥
तोचि जाणावा आत्महत्यारी  । जो न तारी आपणा ॥९॥
बहुधा अज्ञानासी संवादन । घडूंच नये वेदाम्त - निरूपण ॥
तयापुरतें तयासि बोलून । उगें मौनें असावें ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP