मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण १२ वे

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत .


श्रीगणेशाय नम : ॥ श्रीसरस्वत्यै नम : ॥ श्रीगुरुभ्यो नम : ॥

हर्षें रोमांच , उठताति ॥ अष्ट सत्वभाव , प्रगटताति ॥

पावे साम्राज्य , संपत्ति ॥ रंकाचा होई , राव जैसा ॥१॥

चित्तचैतन्यीतें , हारणे ॥ राहिजे तें शुद्ध , ज्ञप्तिरूपें ॥

अखंडीत तें , आपोआपे । ब्रम्हानंदीं , पावतसे ॥२॥

तया सुखाच्या , उत्तम रसा ॥ कोणीन लावी , कसोटी कसा ॥

गोडीस्वादें , आनंद तैसा ॥ केवळचि , अनुभवी जाणती ॥३॥

अमृत चाखी , अपुल्या चवीं , ॥ अवर्णनातें अनुभवी ॥

तेथें , कोणीच , साधू , नाठवी ॥ नासक्या , सडक्या , प्रपंचाशीं ॥४॥

बोलता स्वानं , दाचा धर्म ॥ आठवे सौख्य , परिपूर्ण ॥

तेणेंकरोनी , ज्ञाता सुजाण ॥ ब्रम्हीं गर्क , होतसे ॥५॥

अहंता स्वरूपीं , सहज गळें ॥ विषयतृष्णा , समूळ टळे ॥

इंद्रियाचें , सर्वही लळे ॥ सहजासहजीं , नष्ट होती ॥६॥

महासुखाचें , आगरीं ॥ भोगिते , अनुभवी , सुंदरी ॥

तैसे केवळ , ज्ञानेकरोनी ॥ संत आनंदीं , सदोदित ॥७॥

निरसतां , सर्वही नेणिव ॥ स्वरूपीं समरसें , जाणिव ॥

मग एकछत्री , केवळ राणिव ॥ होते तैसें योगियाशीं ॥८॥

सदा स्वानंदित , सोहळे ॥ विजातीय विषयीं , मन वितळे ॥

आत्मसौख्याच्या , ची मेळे ॥ इंद्रियतृप्ती , आपोआप ॥९॥

परम सौख्या , चिया बळें ॥ एकही स्फूर्ति , नचि स्फुरे ॥

कर्मे सर्व जातींचीं , विसरे ॥ एकाएकीं , निमिष्यांत ॥१०॥

करोनि यज्ञाचीं , बहु कोडीं ॥ उभारती ते स्वर्गीं गुढी ॥

तें वैभवसौख्य , करावे कुर्वंडी ॥ ब्रम्हासौख्या , वरोनियां ॥११॥

आनंद , आनंदाशीं , घोटी ॥ एरापरेशीं , सहज लोटी ॥

त्याहून पलीकडे घाली मिठी ॥ गळा पडे , परब्रम्हीं ॥१२॥

मुक्यानें स्वानुभवीच्या , गोष्टी ॥ करू म्हटलें , तरी कष्टी ॥

सांगोसांगी , न होय तुष्टी ॥ अनुभवाविणें , व्यर्थच कीं ॥१३॥

हुताशनी , होते वटवट ॥ बालकें बिभत्सें , कटकट ॥

करिती , परंतु नुसती चावट ॥ नानुभवीं तीं , सर्वथा ॥१४॥

सुखदु : खाचा , अनुभव । साखर गोडी , ची ही चव ॥

अनुभव न देतां , सर्व वैभव ॥ देतां येते , सहजपणें ॥१५॥

दोघे अनुभवी , जाणती ॥ खुणामुद्रांनीं , समजती ॥

त्वरित परिक्षा , करिताती ॥ त्यांना खोटें , नसेंच कीं ॥१६॥

ब्रम्हाज्ञानाची , नावडी ॥ ते वाहती संसारीं कावडी ॥

तशा मूढा , काय गोडी ॥ लागाव ती , कवण्यापरी ॥१७॥

ब्रम्हासौख्यातें , अनुभवणें । व्यर्थ होते , तेम अनुवादणें ॥

जो अनुभवील , तोचि जाणे ॥ अन्यमूढ , वृथापरी ॥१८॥

ब्रम्हाप्राप्तर्थीं , झटझटावें ॥ सद्‌गुरुशीं शरण जावें ॥

कृपा संपादुनी , भावें ॥ परम अर्थ , साधावा ॥१९॥

ब्रम्हानंदाचें आगर ॥ अनुभवा , पूर्वीं जो पामर ॥

ज्ञानाबले , होतो जो अमर ॥ ब्रम्हीं ब्रम्हा , होवोनिया ॥

इति श्रीपरमामृते मुकुंदराजविरचिते स्वानुभवसौख्यवर्णनं नाम द्वादशं प्रकरणं संपूर्णम् ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP