मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण १५ वें

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


॥ पालुपद ॥

जयदेव, जयदेव, जयजगन्निवासा, अज्ञानातें दवडुनि सज्ञानी व्हावे ही इच्छा दे दासा ॥ जयदेव जयदेव ० ॥

कडवें १ लें .
असतां अमुच्या देहीं, साक्षी ब्रम्हात्मा, नेणिव बुद्धी नेणो, ऐसा जगदात्मा ॥
माया भ्रांती घेऊनि झाला जीवात्मा, मीमी म्हणउनि सारे, बुडवी गुप्तात्मा ॥ जयदेव जयदेव ० ॥
कडवें २ रें.
मायाद्वारें सृष्टी, उदयातें आली, तेणें भ्रम झाला हा, सर्वांअंतरीं ॥
ज्ञानें करुनी तिजला, विलयाते लावी, निर्भ्रम होतां ब्रम्हा, झळके अंतरीं ॥ जयदेव जयदेव ० ॥
कडवें ३ रें.
त्यागुनि शबलब्रम्हा, ज्ञाने समद्दष्टी होतां गुप्तात्मातें अंतरिं तो प्रगटी ॥
तेथें राही त्याची, निश्चलता वृत्ती, स्वानंदाते भोगुनि, पावे तो मुक्ती ॥ जयदेव जयदेव ० ॥
कडवें ४ थें.
सद्‌गुरुनाथें जेव्हां, अनुकंपा केली, स्वयमेव आवस्था, जागृत ती जहाली ॥
मीच स्वयें ब्रम्हा, ऐशी वृत्ती ठेली, तेव्हां द्वैतबुद्धी, सहजची गेली ॥ जयदेव जयदेव ० ॥
कडवें ५ वें.
तूं मी ऐसे नुरलें, जणु कांहीं नाहीं, झालों रूपीं एक ऐसा लवलाही ॥
मुक्ती होता जाणा, नुरलेची कांहीं, ब्रम्हीं रत हौनिया, माझा मी पाही ॥ जयदेव जयदेव ० ॥
कडवें ६ वें.
आत्मज्ञानें करूनी, अनुभविता होई, साक्षात्कारें प्रेमहि, संपादुनि पाही ॥
मुक्तिद्वारामाजी, पाउल हें ठेवी, ॥ सद्‌गुरुनाथापायी, शरणागत होई ॥ जयदेव जयदेव ० ॥
कडवें ७ वें.
अज्ञानानें वेडे, मानव हे जहाले, साधूसंतें ऐसें, वर्णनही केलें ॥
मृत्यूयोगें कोणी, जागे जरि झाले, पुनरपि भ्रांतीयोगें, व्यर्थचि तें गेले ॥ जयदेव जयदेव ० ॥
कडवें ८ वें
मायाभ्रांतीपासुनि, सुटका विश्वाला, नसतां येतो पाहतां, भलताची घाला, ॥
ब्रम्हीं रत हौनिय, सोडूं कर्माला, तेव्हां देहोद्धारें, षावूं मानाला ॥ जयदेव जयदेव ० ॥
कडवें ९ वें.
ब्रम्हीं रत झाले ते, ब्रम्हाची होती, त्यांना नलगे दुसरी, पावाया मुक्ती, ॥
संते ज्ञाने केली प्रीतीनें भक्ति ॥ ऐका सारे जनहो, त्यांची ही युक्ती ॥ जयदेव जयदेव ० ॥
कडवें १० वें.
गणपत नामें कडुनी, देहीं हा आला, बाबानामें करुनी, स्मरतो बापाला ॥
अडनांवानें माटे मिरवी देहाला, तारी सत्वर येई, मृत्युचा घाला ॥ जयदेव जयदेव ० ॥

आरतीच्या ओंव्या २२ धरल्या व एकंदर ओंव्यांत मिळवल्या.



ॐ श्रीपरब्रम्हा - परमेश्वरार्पणमस्तु ॥
ॐ तत्सत् ब्रम्हार्पणमस्तु ॥

दक्षरपदभ्रष्टं मात्नाहीनं च यत् भवेत् ॥
तत्सर्वं क्षम्मतां देव प्रसीद परमेश्वर ॥१॥
श्रीमुकुंदरायजीस क्षमा भाकून आभार प्रदर्शक आर्या - केला तुम्हीं ग्रंथ, दयार्द्रबुद्धया ॥
स्पष्टार्थ केला तैसाचि बुद्धया ॥ आभार मानून, विनवीत सध्या ॥ क्षमा करावी परमार्थबुद्धया ॥१॥

समाप्त.


N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP