मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
सद्‌गुरु व पीर सारखेच

प्रसंग सतरावा - सद्‌गुरु व पीर सारखेच

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


श्रीगुरु सत्‍य जुल जलालुल्‍ला होगनी प्यारा । जयो जी जयवंत नरा । विश्र्वव्यापक निज परमेश्र्वरा । रहिमान साच्या ॥१॥
अव्वल समजो एक बिस्‍मिल्‍ला । मग सहस्र नामें विश्र्व व्यापला । बंदगी करो छोडो गलबला । सद्‌गुरु सेवूनियां ॥२॥
सच्चा पीर कहे मुसलमान । मर्‍हाटे म्‍हणती सद्‌गुरु पूर्ण । परी दोहींत नाहीं भिन्नपण । आंखे खोल देखो भाई ॥३॥
छपन्न भाषा वचन प्रकार । करिती एक अल्‍लाकि जिकीर । भाषण भाषितां करिती किरकीर । खिल्‍लाफ पकडकर ॥४॥
समजो खिलाफ कुफरकी निषाणी । तेणें विश्र्व गोविलें भांडणीं । स्‍वहित करील आत्‍मज्ञानी । पीरके मेहरसु ॥५॥
फारसीनें आबे आयेद । पाणी मागे मर्‍हाठा नेणें भेद । तेथें प्रवर्तला अनुवाद । देखो समजेविण ॥६॥
तान्हेला कानडा म्‍हणे निरकुड । मुसलमान कहे कौं करतां गडबड । दुभाषानें दोहींस करुनी मूढ । नीर पाजिले परियेसा ॥७॥
दीर्घ छप्पन्न भाषेची किल्‍ली । कळों आली अनिर्वाच्य बोली । त्‍याचीच जाणा भ्रांत फिटली । ईश्र्वर आभास भासे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP