प्रसंग सतरावा - अहंकाराच्या स्त्रियांबहिणींचा विलाप
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
वजीर म्हणती पाडाव केलें मना । तेव्हांच अपेश आलें सत्य जाणा । उगेंचि आलों भांडणा । मूर्खवादें करूनियां ॥२११॥
उरलें कटक पळोनि द्विदळा गेलें । तेंहि छापा घालूनि मारिलें । अवघेंचि निभंजन केलें । आत्म्या राउतें ॥२१२॥
महद माया अहंकाराची माता । ते महाशब्द करी तत्त्वतां । धाय मोकलूनि रडे सुता । कैसें आम्हांसी परदेशी केलें ॥२१३॥
आशा मनसा कल्पना तृष्णा । ह्या अहंकाराच्या स्त्रिया जाणा । सत्या निवतील वैराग्य दहना । अहेव वाणें देऊनी ॥२१४॥
ऐका शंका लज्जा साजणी । ह्या तंव अहंकाराच्या बहिणी । रुदना करिती धाय मोकलुनी । त्या रणामध्यें ॥२१५॥
आशा मनसा म्हणे रे देवा । अहंकारें आमची चालविली ठेवा । आतां कवण आमच्या मावा । झांकतील पैं ॥२१६॥
परोपरी गहिंवरे ते आशा । धाय मोकलूनि रडे ते मनसा । वांचल्या भोगिजेल अवदशा । बाईजी सती निघावें ॥२१७॥
ऐसी बोलिली ते मनसा । आशा म्हणे कल्पनेतें पुसा । कल्पना म्हणे वो विश्र्वासा । तुम्ही मिळावें ॥२१८॥
कल्पना म्हणे वो तृष्णे । आम्हांस मोकलिलें अहंकारानें । त्यामागें धिग् जिणें विधवापणें । लोक पाचारिती ॥२१९॥
कल्पना बोले उत्तर । मज शिरी असतां अहंकार । म्यां बहुतांचे केले परिहार । कोणा ठाऊक न होतां ॥२२०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP