प्रसंग सतरावा - विष्णू (चक्रा) ची भेट
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
मग स्वयें जालों रणशूरा । ॐकारींहूनि चालिलों मणिपुरा तेथें दहा नारींनीं अवधारा । उपचार आरंभिला ॥६२॥
चालिलों मणिपुरा । तेथें दहा नारींनीं अवधारा । उपचार आरंभिला ॥६२॥
घेऊनि नारीचा उपचार । शकुनगांठ बांधिली साचार । मग विष्णु पुसे उत्तर । कवण कार्या आलेती ॥६३॥
मग विष्णूसी केलें प्रतिवचन । भेटी घ्यावया हेंचि कारण । अहंकार मारिजेसें लक्षण सांगिजो जी आम्हां ॥६४॥
मग विष्णू बोलिले उत्तर । सेवावें सद्गुरूचें माहेर । गहिन व्हावें जैसा समुद्र । मग अहंकार मारावा ॥६५॥
मग तेथूनहि निघालों । पुढें अनुहातां प्रवेशलों । जाऊनि ईश्र्वरास भेटलो । सात्विकपणें ॥६६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP