प्रसंग सतरावा - ब्रह्या (चक्रा) ची भेट
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आधारापासूनि मांडणी । चौदा भुवनांचीं उभवणी । ते सांगेन ऐका चित्त देऊनि । सावधपणें सर्वथा ॥५८॥
पूर्व दिशा पाठीस घेऊन । मग चालिलों आधारींहून । ब्रह्मयास भेटलों जाऊन । सादृष्टानीं ॥५९॥
ब्रह्मा पुसे शांत वचन । अवलंबन केलें कवण्या गुणें । तें मजपें सांगा जी शीघ्र खुणें । कळों यावयालागीं ॥६०॥
मग ब्रह्मयास केले विनवणी । सुमुहूर्त सांगा जी मजलागुनी । ब्रह्मा म्हणे उठा जी तत्क्षणीं । व्यतिपात ग्रासूनियां ॥६१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP