मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
मन तेजियास थोडी विश्रांति

प्रसंग सतरावा - मन तेजियास थोडी विश्रांति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


आत्‍मा म्‍हणे हा तेजी धोपला । संग्राम करितां दमगीर जाला । उतरोन पाहिजे आसुदा केला। विशुद्ध कंठकमळी ॥२३५॥
आत्‍मा विशुद्धा आला मुरडोनी । तेजी बांधिला अधिष्‍ठानीं । बोध-गुळाची चांचणी । चारूनि सावचित केला ॥२३६॥
बत्तिस पळें एकविस दिवस । ठाणबंदीं बांधिलें तेजियास । सुख वाटे राउता तेजियास । कंटाळा सोडूनियां ॥२३७॥
निम तंग करूनि जीन वोढिला । मागुता आतमा तेजियावरी स्‍वार जाला । ऊर्ध्वं गड न्याहाळूं लागला । विहंगम तेजी थरके ॥२३८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP