मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
संग्रामारंभीं सद्‌गुरुचा निरोप

प्रसंग सतरावा - संग्रामारंभीं सद्‌गुरुचा निरोप

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ऐका सद्‌गुरु नमस्‍कारून । मांडिलें एकांगीं शूरत्‍वपण । ते ऐकती संत साधुजन । घमशा न झोंटधरणीचें ॥३०॥
ते असती सद्‌गुरूचे अंकिले । परतोन आपआपणांतें झुंजले । ते पावती गा शब्‍दाचे सखोले । स्‍वयें साक्ष बाणली ॥३१॥
शब्‍दज्ञानें धरणें मतीं तर्की । जैसें श्र्वान सांचोली ऐकोन करी भुंकी । परी दृष्‍टीं नाहीं देखिली सायकीं । कवण काय ऐसी ॥३२॥
रणांत शूर भांडला शरीरें । बैसले ठायीं ऐकिलें कवीश्र्वरें । त्‍यावरी बिरमाल केला बंदिस्‍त थोरें । परी रण दृष्‍टीं देखिलें नाहीं ॥३३॥
तदन्यायें पंडित ज्ञानी । कुशळ विवंचना करिती वचनीं । परी नेणती कमाईची मांडणी । ते सांगो आरंभिली ॥३४॥
अवलोकूनि सद्‌गुरु उदार । साष्‍टांगें केला नमस्‍कार । पुसोनि संग्रामाचा विचार । मग निरोप घेतला ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP