मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
शेख महंमदाची विनवणी

प्रसंग सतरावा - शेख महंमदाची विनवणी

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


शेख महंमदें उत्तर दिधलें प्रीति । मी नेणें कुशलता व्युत्‍पत्ति । संस्‍कारीं पंडित हांसती । शुद्ध भाषा नेणें मी ॥४९॥
मी यातीचा मलिवंश । संस्‍कार न ये मर्‍हाठीस । बोल ठेविती कवित्‍वास । कुशल ज्ञानी ॥५०॥
नाहीं पाहिलें शास्त्रपुराण । बोलों नाहीं शिकलों शुद्ध वचन । तुझें तूंचि करी वो चर्चन । ईश्र्वरसामर्थ्ये ॥५१॥
मग सरस्‍वती बोलिली वचचन । तूं योगभ्रष्‍ठ मुळापासून । म्‍हणोनि ईश्र्वरें मजलागुन । वसविलें वैखरीं ॥५२॥
तुझें हृदयीं असे ईश्र्वर । मज म्‍हणे बाळ बोले संस्‍कार । निज गुज परात्‍पर । ऐसी आज्ञा दिधली असे ॥५३॥
हृदयीं ईश्र्वर करी विवंचना । मग मी बोलिलों सगुण वचना । तूं सांडूनि चंचळपणा । गंभीर होई ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP